ETV Bharat / sports

इंग्लंडचा जो डेन्ली आयर्लंडविरुद्धच्या मालिकेतून बाहेर

author img

By

Published : Aug 1, 2020, 12:45 PM IST

लिव्हिंगस्टोनने इंग्लंडकडून दोन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि मालिकेच्या उर्वरित दोन सामन्यांपैकी अंतिम अकरामध्ये त्याची निवड झाली तर तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करेल.

joe denly ruled out of the Ireland odi series due to a back injury
इंग्लंडचा जो डेन्ली आयर्लंडविरुद्धच्या मालिकेतून बाहेर

लंडन - इंग्लंडचा फलंदाज जो डेन्ली पाठीच्या दुखापतीमुळे आयर्लंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतून बाहेर पडला आहे. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) बुधवारी आपल्या संकेतस्थळावर एक निवेदन प्रसिद्ध केले आणि याबाबत माहिती दिली. डेन्लीच्या जागी लियाम लिव्हिंगस्टोनचा 14 सदस्यीय संघात समावेश करण्यात आला आहे.

लिव्हिंगस्टोनने इंग्लंडकडून दोन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि मालिकेच्या उर्वरित दोन सामन्यांपैकी अंतिम अकरामध्ये त्याची निवड झाली तर तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करेल.

गुरुवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडने आयर्लंडला 6 विकेट्सने पराभूत करत तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात डेव्हिड विलेने पाच गडी बाद केले तर, सॅम बिलिंग्जने नाबाद 67 धावा केल्या. एकदिवसीय कारकिर्दीत प्रथमच पाच बळी घेतलेल्या विलेला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.

या मालिकेचा दुसरा सामना आज 1 ऑगस्ट (शनिवार) रोजी साऊथम्प्टनच्या एजेस बाऊल येथे होईल. कोरोनादरम्यानची ही पहिली एकदिवसीय मालिका असून आयसीसी विश्वचषक सुपर लीग स्पर्धा या मालिकेपासून सुरू झाली आहे. मालिकेचे सर्व सामने रिकाम्या स्टेडियममध्ये खेळले जातील.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.