ETV Bharat / sports

अंतिम फेरी गाठता न येणे लाजिरवाणे..., काय म्हणाला विल्यमसन - आयपीएल २०२० न्यूज

सनरायझर्स हैदराबादचा अनुभवी फलंदाज केन विल्यमसनने आयपीएलची अंतिम फेरी गाठता न येणे, ही बाब आमच्यासाठी लाजिरवाणी असल्याची कबुली दिली. त्याचवेळी त्याने स्पर्धेतील संघाच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले.

it is embarrising to not get a chance to play in IPL final but we had a good season says kane williamson
अंतिम फेरी गाठता न येणे लाजिरवाणे..., काय म्हणाला विल्यमसन जाणून घ्या
author img

By

Published : Nov 9, 2020, 3:22 PM IST

अबुधाबी - आयपीएलची अंतिम फेरी गाठता न येणे, ही बाब आमच्यासाठी लाजिरवाणी असल्याची कबुली सनरायझर्स हैदराबादचा अनुभवी फलंदाज केन विल्यमसनने दिली. दिल्ली कॅपिटल्सने उपांत्य फेरीत हैदराबादचा १७ धावांनी पराभव करत त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले. या पराभवानंतर विल्यमसन बोलत होता.

विल्यमसन म्हणाला की, 'दिल्लीचा संघ चांगला होता. ते लय प्राप्त करण्याच्या प्रयत्नात होते. त्यात ते यशस्वी ठरले. धावांचा पाठलाग करताना, धोका पत्करणे गरजेचे होते. अशात आमची सुरूवात खराब झाली. पण आमच्या मधल्या फळीतील फलंदाज भागिदारी रचण्यात यशस्वी ठरले. अखेरच्या काही षटकात सामना आमच्या हातातून निसटला.'

आयपीएलची अंतिम फेरी गाठता न येणे ही बाब आमच्यासाठी लाजिरवाणी बाब आहे. पण आमच्या संघाने मागील तीन आठवड्यात चांगली कामगिरी नोंदवली. याचा आम्हाला अभिमान आहे. स्पर्धेच्या सुरूवातीला अनेक सामने आम्ही थोड्या फरकाने गमावले. आयपीएलमध्ये प्रत्येक संघ मजबूत आहेत. यामुळे चुकीला माफी नसते. आम्हाला लय प्राप्त करण्यासाठी वेळ लागला असल्याचेही विल्यमसनने सांगितले.

आमच्यासाठी तेरावा हंगाम चांगला राहिला. युवा आणि अनुभवी खेळाडू यांच्यात चांगला ताळमेळ होता. युवा खेळाडूंना अनेक संधी मिळाल्या. या संधी त्यांच्या भविष्यासाठी चांगल्या आहेत, असेही विल्यमसनने सांगितले.

असा रंगला सामना -

दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. तेव्हा त्याने शिखर धवनसोबत मार्कस स्टॉयनिसला सलामीला पाठवले. शिखर धवन आणि मार्कस स्टॉयनिस यांनी केलेल्या ८६ धावांच्या मजबूत सलामीनंतर व हेटमायरने शेवटच्या काही षटकात केलेल्या जोरदार फटकेबाजीच्या जोरावर दिल्लीने हैदराबादपुढे विजयासाठी १९० धावांचे मजबूत लक्ष्य ठेवले. धवनने ५० चेंडूत ७८ धावांची खेळी करत दिल्लीच्या मोठी धावसंख्येची पायाभरणी केली. तर अखेरच्या षटकात हेटमायरने फटकेबाजी करत २२ चेंडूत ४२ धावांची खेळी केली.

पाठलागात हैदराबादला अपयश

दिल्लीच्या १९० धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर २ धावांवर त्रिफळाचीत झाला. खेळपट्टीवर स्थिरावलेल्या प्रियम गर्ग (१७) आणि मनिष पांडे (२१) या दोघांना स्टॉयनीसने एका षटकात माघारी पाठवले. अनुभवी जेसन होल्डर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात ११ धावांवर बाद झाला. युवा अब्दुल समदच्या साथीने महत्वपूर्ण भागीदारी करत विल्यमसनने अर्धशतक पूर्ण केलं. पण त्याचे प्रयत्न तोकडे पडले. त्याने ४५ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकार खेचत ६७ धावा केल्या. अखेरीस दिल्लीने हा सामना १७ धावांनी जिंकला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.