ETV Bharat / sports

ऑस्ट्रेलियन खेळाडू कोचिंगवर नाराज, लँगर म्हणाले... - जस्टीन लँगर न्यूज

मी अनेक वर्षांपासून इमानदारीनं काम केलं आहे. नाराजीची चर्चा भारताविरुद्धची कसोटी मालिका संपल्यानंतर सुरू झाली. जर काही अडचण होती तर खेळाडू तसेच कोचिंग स्टापने मला याबद्दल सांगायला हवं होतं, असे लँगर म्हणाले.

it-hurts-langer-on-emotional-toll-as-aus-head-coach
ऑस्ट्रेलियन खेळाडू कोचिंगवर नाराज, लँगर म्हणाले...
author img

By

Published : Feb 28, 2021, 5:00 PM IST

मेलबर्न - ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांच्या कोचिंगवर संघातील काही वरिष्ठ खेळाडू तसेच कोचिंग स्टाप नाराज आहे. याविषयी लँगर यांना कळाले. तेव्हा त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

लँगर यांनी एका संकेतस्थळाशी बोलताना सांगितलं की, 'संघातील खेळाडू आणि कोंचिग स्टाप माझ्यावर नाराज असल्याचे मला कळाले. तेव्हा मला याचं खूप दु:ख वाटलं. खेळाडूंना काही त्रास होत असेल तर त्यांनी माझ्याशी व्यक्तिगत चर्चा करायला हवी होती.'

मी अनेक वर्षांपासून इमानदारीनं काम केलं आहे. नाराजीची चर्चा भारताविरुद्धची कसोटी मालिका संपल्यानंतर सुरू झाली. जर काही अडचण होती तर खेळाडू तसेच कोचिंग स्टापने मला याबद्दल सांगायला हवं होतं, असे देखील लँगर म्हणाले.

एका ऑस्ट्रेलियन माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धची कसोटी मालिका २-१ ने गमावली. त्यानंतर ऑस्ट्रेलिया संघातील काही वरिष्ठ खेळाडू लँगरवर नाराज होते. दरम्यान, या प्रकरणात ऑस्ट्रेलियाचा अनुभवी खेळाडू स्टिव्ह स्मिथने लँगर यांची पाठराखण करत लँगर यांना समर्थन दिलं आहे.

हेही वाचा - ICC Test Rankings: रोहित शर्मा 'टॉप-१०' मध्ये दाखल

हेही वाचा - NZ vs ENG, ३rd ODI : न्यूझीलंडचा इंग्लंडवर ७ गडी राखून विजय

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.