ETV Bharat / sports

इरफानने धोनीसह निवडला निवृत्तीच्या सामन्यासाठी माजी क्रिकेटपटूंचा संघ; विराटच्या संघाशी घ्यायचाय 'पंगा'

मागील काही वर्षांमध्ये भारताचे बरेच दिग्गज क्रिकेटपटू निवृत्त झाले. पण माजी खेळाडू सचिन तेंडुलकर वगळता अन्य कोणत्याही क्रिकेटपटूला निवृत्तीचा सामना खेळता आला नाही. विरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड, व्ही.व्ही.एस लक्ष्मण, गौतम गंभीर, झहीर खान या दिग्गजांना आपली निवृत्ती मैदानात घेता आली नव्हती. त्यामुळे ज्या खेळाडूंना निवृत्तीचा सामना खेळता आला नाही, त्यांच्यासाठी एक सामना खेळवावा, अशी इच्छा इरफानने जाहीर केली आहे.

इरफानने धोनीसह निवडला निवृत्तीच्या सामन्यासाठी माजी क्रिकेटपटूंचा संघ; विराटच्या संघाशी घ्यायचाय 'पंगा'
इरफानने धोनीसह निवडला निवृत्तीच्या सामन्यासाठी माजी क्रिकेटपटूंचा संघ; विराटच्या संघाशी घ्यायचाय 'पंगा'
author img

By

Published : Aug 23, 2020, 3:24 PM IST

मुंबई - भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने १५ ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. यामुळे चाहत्यांसह आजी-माजी खेळाडूंना धक्का बसला. कारण प्रत्येकाची इच्छा होती की, धोनीने निवृत्तीचा सामना खेळायला हवा. पण तसे घडले नाही. अनपेक्षित निर्णयासाठी प्रसिद्ध असलेल्या धोनीने अचानक निवृत्तीची घोषणा केली. आता निवृत्तीच्या सामन्यावरून माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने आपले मत व्यक्त केले आहे.

इरफान पठाणने एक ट्विट केले आहे. यात त्याने ११ खेळाडूंची नावे असलेला एक संघ निवडला आहे. तो संघ आहे, ज्या खेळाडूंना निवृत्तीचा सामना खेळता आलेला नाही अशा खेळाडूंचा. मागील काही वर्षांमध्ये भारताचे बरेच दिग्गज क्रिकेटचपटू निवृत्त झाले. पण माजी खेळाडू सचिन तेंडुलकर वगळता अन्य कोणत्याही क्रिकेटपटूला निवृत्तीचा सामना खेळता आला नाही. विरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड, व्ही.व्ही.एस लक्ष्मण, गौतम गंभीर, झहीर खान या दिग्गजांना आपली निवृत्ती मैदानात घेता आली नव्हती. त्यामुळे ज्या खेळाडूंना निवृत्तीचा सामना खेळता आला नाही, त्यांच्यासाठी एक सामना खेळवावा, अशी इच्छा इरफानने जाहीर केली आहे.

  • Many people are talking about a farewell game for retired players who didn't get a proper send-off from the game. How about a charity cum farewell game from a team consisting of retired players vs the current Indian team? pic.twitter.com/diUiLXr9XQ

    — Irfan Pathan (@IrfanPathan) August 22, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मजेशीर बाब म्हणजे, इरफानने या खेळाडूंच्या संघाचा सामना विराट कोहलीच्या संघासोबत खेळवण्यात यावा, अशी इच्छा व्यक्त केली आहे. इरफानच्या मते, बीसीसीआयने जर हा सामना खेळवायचे ठरवले तर तो चांगला रंगतदार होऊ शकतो. कारण जे माजी खेळाडू आहेत ते अजूनही फिट दिसत आहेत. कारण यामधील काही खेळाडू अजूनही क्रिकेट खेळत आहेत. तर काही प्रशिक्षण देत आहेत. त्यामुळे हा सामना खेळवला गेला तर त्याला चाहत्यांचाही चांगला प्रतिसाद मिळू शकतो, असे इरफानला वाटते.

हेही वाचा - रोहितसह पाच जणांना खेलरत्न, तर वेगवान गोलंदाज इशांत शर्माला अर्जुन पुरस्कार

हेही वाचा - मोठी बातमी..! एप्रिलमध्ये रंगणार आयपीएल २०२१चा हंगाम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.