साऊथम्प्टन - एजेस बाऊल मैदानावर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात आयर्लंडने इंग्लंडला सात गडी राखून धूळ चारली. कर्णधार इयान मॉर्गनच्या (१०६) शतकाच्या जोरावर इंग्लंडने आयर्लंडसमोर ३२९ धावांचे लक्ष्य ठेवले. मात्र, या सामन्यात आयर्लंडने विजय मिळवत इंग्लंडला २०११च्या विश्वकरंडकाची आठवण करून दिली. ही मालिका इंग्लंडने २-१ अशी जिंकली आहे.
-
An incredible win!#ENGvIRE | #BackingGreen ☘️ 🏏 pic.twitter.com/0FyiGczyxN
— Cricket Ireland (@Irelandcricket) August 4, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">An incredible win!#ENGvIRE | #BackingGreen ☘️ 🏏 pic.twitter.com/0FyiGczyxN
— Cricket Ireland (@Irelandcricket) August 4, 2020An incredible win!#ENGvIRE | #BackingGreen ☘️ 🏏 pic.twitter.com/0FyiGczyxN
— Cricket Ireland (@Irelandcricket) August 4, 2020
या सामन्यात नाणेफेक जिंकून आयर्लंडने इंग्लंडला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. इंग्लंडचे सलामीवीर जेसन रॉय, बेअरस्टो, विन्स स्वस्तात माघारी परतल्यावर कर्णधार मॉर्गनने टॉम बंटॉनसोबत डाव सावरला. बंटॉनने ६ चौकार आणि एका षटकारसह ५८ धावा केल्या. तर, मॉर्गनने १५ चौकार आणि ४ षटकारासह १०६ धावा केल्या. या मालिकेत फॉर्मात असलेल्या विलेनेही उत्तम फलंदाजीचा नमुना सादर करत ५१ धावा तडकावल्या. त्याला टॉम करनने ३८ धावा करत उत्तम साथ दिली. आयर्लंडकडून क्रेग यंगने ३ जोश लिटल आणि कर्टिस कॅम्फरने प्रत्येकी २ तर, अडेरने एक बळी घेतला.
प्रत्युत्तरात आयर्लंडने खेळताना इंग्लंडने हे आव्हान एक चेंडू राखून पूर्ण केले. सलामीवीर पॉल स्टर्लिंग ९ चौकार आणि ६ षटकारांसह १४२ धावा केल्या. तर, अँड्रयू बाल्बिर्नीने १२ चौकारांसह ११२ धावा फटकावल्या. टेक्टर आणि ओब्रायनने आयर्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. इग्लंडकडून डेव्हिड विलेला आणि आदिल रशिदला एक बळी मिळाला. या मालिकेसाठी विलेला मालिकावीर तर, तिसऱ्या सामन्यासाठी पॉल स्टर्लिंगला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.