नवी दिल्ली - मुंबई इंडियन्स संघाने आपल्या सर्व खेळाडूंना चार दिवसांचा ब्रेक दिला आहे. जेणेकरून संघातील खेळाडू आराम करू शकतील आणि त्यांच्या कुटुंबासह वेळ घालवू शकतील. ब्रेक दिल्याने आयपीएलच्या 12 व्या मोसमातील अखेरच्या सामन्यांमध्ये आपले 100 टक्के योगदान देऊ शकतील या उद्देशाने संघव्यवस्थापनाने हा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, व्यवस्थापनाने सर्व खेळाडूंना सरावापासून लांब राहण्यास सांगितले असून ४ दिवसांच्या सुट्टीमध्ये फक्त आराम करण्याची सुचना दिली आहे. मुंबईचा पुढचा सामना २५ एप्रिलला चेन्नईसोबत होणार. बहुतेक परदेशी खेळाडू हे थेट चेन्नईला रवाना झाले आहेत, तर संघातील भारतीय खेळाडू आपल्या घरी कुटुंबियांसह वेळ घालवत आहेत.
आयपीएलनंतर लगचेच विश्वचषक स्पर्धा सुरु होणार आहे. मुंबई इंडियन्स संघात खेळणारे रोहित शर्मा, हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराह यांची विश्वचषकासाठीच्या भारतीय संघात निवड झाली आहे. त्यामुळे या सुट्टीचा फायदा या ३ खेळाडूंना होणार आहे.