ETV Bharat / sports

आयपीएल २०२० : लिलावाची तारीख ठरली, खेळाडू खरेदी करण्यासाठी प्रत्येक संघाकडे असणार ८८ कोटी! - auction in ipl

१९ डिसेंबरला हा लिलाव पार पडणार असून यावेळी लिलावाची जागा बदलण्यात आली आहे. प्रत्येक संघाला खेळाडू खरेदी करण्यासाठी ८८ कोटी खर्च करता येणार आहेत. यापूर्वी ८५ कोटींची मर्यादा ठेवण्यात आली होती. मात्र, ती वाढवून आता ८८ कोटींवर ठेवण्यात आली आहे.

आयपीएल २०२० : लिलावाची तारीख ठरली, खेळाडू खरेदी करण्यासाठी प्रत्येक संघाकडे असणार ८८ कोटी!
author img

By

Published : Oct 1, 2019, 12:30 PM IST

कोलकाता - क्रिकेटमधील 'श्रीमंत स्पर्धा' अशी ओळख असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पुढील हंगामाचे मोठे वृत्त समोर आले आहे. आयपीएल २०२० साठी खेळाडूंचा लिलाव बंगळूरु ऐवजी कोलकाता शहरात पार पडणार आहे.

हेही वाचा - संदीप पाटील यांची माघार, एमसीएच्या अध्यक्षपदी 'या' व्यक्तीची लागणार वर्णी

१९ डिसेंबरला हा लिलाव पार पडणार असून यावेळी लिलावाची जागा बदलण्यात आली आहे. प्रत्येक संघाला खेळाडू खरेदी करण्यासाठी ८८ कोटी खर्च करता येणार आहेत. यापूर्वी ८५ कोटींची मर्यादा ठेवण्यात आली होती. मात्र, ती वाढवून आता ८८ कोटींवर ठेवण्यात आली आहे.

२०१९ च्या हंगामात आयपीएलमधील सर्व संघांनी मिळून ३८.४५ कोटी रुपयांची बचत केली होती. त्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सने सर्वात जास्त म्हणजे ८.२ कोटी, राजस्थान रॉयल्सने ७.५ कोटी, कोलकाता नाईटराइडर्सने ६.०५ कोटी, सनराइजर्स हैदराबादने ५.३ कोटी, किंग्स इलेवन पंजाबने ३.७ कोटी, चेन्नई सुपरकिंग्सने ३.२ कोटी, मुंबई इंडियन्सने ३.०५ कोटी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १.८ कोटींची बचत केली होती.

एका वृत्तानुसार, पुढील वर्षाच्या एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये आयपीएलच्या नव्या हंगामाचा प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्वच संघांनी जोरदार तयारी सुरु केली आहे.

Intro:Body:

ipl auction 2020 will held in kolkata

ipl auction 2020, ipl auction latest news, ipl auction 2020 venue, auction in ipl, आयपीएलमधील लिलाव

आयपीएल २०२० : लिलावाची तारीख ठरली, खेळाडू खरेदी करण्यासाठी प्रत्येक संघाकडे असणार ८८ कोटी!

कोलकाता - क्रिकेटमधील 'श्रीमंत स्पर्धा' अशी ओळख असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पुढील हंगामाचे मोठे वृत्त समोर आले आहे. आयपीएल २०२० साठी खेळाडूंचा लिलाव बंगळूरु ऐवजी कोलकाता शहरात पार पडणार आहे.

हेही वाचा -

१९ डिसेंबरला हा लिलाव पार पडणार असून यावेळी लिलावाची जागा बदलण्यात आली आहे. प्रत्येक संघाला खेळाडू खरेदी करण्यासाठी ८८ कोटी खर्च करता येणार आहेत. यापूर्वी ८५ कोटींची मर्यादा ठेवण्यात आली होती. मात्र, ती वाढवून आता ८८ कोटींवर ठेवण्यात आली आहे.

२०१९ च्या हंगामात आयपीएलमधील सर्व संघांनी मिळून ३८.४५ कोटी रुपयांची बचत केली होती. त्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सने सर्वात जास्त म्हणजे ८.२ कोटी,  राजस्थान रॉयल्सने ७.५ कोटी, कोलकाता नाईटराइडर्सने  ६.०५ कोटी, सनराइजर्स हैदराबादने ५.३ कोटी, किंग्स इलेवन पंजाबने ३.७ कोटी, चेन्नई सुपरकिंग्सने ३.२ कोटी, मुंबई इंडियन्सने ३.०५ कोटी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १.८ कोटींची बचत केली होती.

एका वृत्तानुसार, पुढील वर्षाच्या एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये आयपीएलच्या नव्या हंगामाचा प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्वच संघांनी जोरदार तयारी सुरु केली आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.