मुंबई - आयपीएलच्या चौदाव्या हंगामात शनिवारी दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्या दरम्यान सामना झाला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये रंगलेल्या या सामन्यात नवख्या ऋषभ पंत समोर अनुभवी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे आव्हान होते. धोनीच्या संघाला शह देत दिल्ली कॅपिटल्सने या हंगामातील आपला पहिला विजय मिळवला. दिल्लीने चेन्नईचा सात गडी राखून पराभव केला. दिल्लीच्या संघाने 18.4 षटकांमध्ये 3 गड्यांच्या बदल्यात विजयासाठी लागणाऱ्या 190 धावा केल्या.
शिखर धवनने सर्वाधिक 85 धावा केल्या. त्यात 10 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. सलामीवीर पृथ्वी शॉने 38 चेंडू खेळून 9 चौकार आणि 3 षटकार लगावले. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 138 धावांची भागीदारी केली. कर्णधार ऋषभ पंत 15 धावांवर नाबाद राहिला. चेन्नईच्या बाजून गोलंदाज शार्दुल ठाकुरने दोन बळी घेतले. तर, ड्वेन ब्राव्हेने एक बळी घेतला.
त्यापूर्वी प्रथम फलंदाजी करून दिल्लीने चेन्नईसमोर विजयासाठी 189 धावांचे लक्ष्य ठेवले होते. चेन्नईचा अनुभवी फलंदाज सुरेश रैनाने अर्धशतक केले. त्याने 36 चेंडू खेळत 3 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 54 धावा केल्या. मोइन अलीने 36 धावा केल्या. सॅम करनने तूफानी खेळ करत 34 धावा केल्या. त्यात 4 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे. कर्णधार धोनी मात्र, अपयशी राहिला. त्याला शून्यावर बाद करण्यात दिल्लीच्या संघाला यश आले.