ETV Bharat / sports

IPL २०२० : ...अन् 'कॅप्टन कूल' धोनीचा पारा चढला! - राजस्थान विरुद्ध चेन्नई सामना

१७व्या षटकात धोनीने एका चेंडूवर टॉम करन विरोधात झेलबादचे अपील केले. तेव्हा पंचानी करनला बाद ठरवले. या निर्णयावर पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आली आणि तिसऱ्या पंचांशी सल्लामसलत केल्यानंतर करनला नाबाद घोषित करण्यात आले. यामुळे चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी मैदानात संतापलेला पहायला मिळाला.

IPL 2020: Umpires recall Tom Curran after giving out, Dhoni loses cool
IPL २०२० : गोलंदाजांचाची होत असलेली धुलाई पाहून धोनी बेईमानीवर उतरला, जाणून घ्या प्रकरण
author img

By

Published : Sep 23, 2020, 5:14 PM IST

शारजाह - चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात शारजाहच्या मैदानात सामना पार पडला. या सामन्यात राजस्थानच्या फलंदाजांनी चेन्नईच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. राजस्थानने १७ षटकांत १७६ धावा धावफलकावर लावल्या. अशात धोनीने एका चेंडूवर टॉम करन विरोधात झेलबादचे अपील केले. तेव्हा पंचानी करनला बाद ठरवले. या निर्णयावर पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आली आणि तिसऱ्या पंचांशी सल्लामसलत केल्यानंतर करनला नाबाद घोषित करण्यात आले. यामुळे चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी मैदानात संतापलेला पहायला मिळाला.

घडले असे की, राजस्थानचे फलंदाज चेन्नईच्या गोलंदाजांवर भारी पडले. त्याने चेन्नईच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. १७वे षटक टाकण्यासाठी दीपक चहल आला. तेव्हा समोर स्टिव्ह स्मिथ आणि टॉम करन ही जोडी मैदानात होती. चहरच्या पाचव्या चेंडूवर करनने पूल करण्याचा प्रयत्न केला असता, तो चेंडू त्याच्या थायपॅडला लागून यष्टीरक्षक धोनीकडे गेला आणि धोनीने तो चेंडू झेलत झेलबादचे अपील केले. त्याचे अपील उचलून धरत मैदानातील पंच शमशुद्दीन यांनी करनला बाद ठरवले.

पंचांच्या या निर्णयामुळे टॉम करनला धक्का बसला, परंतु डीआरएसची संधी गमावल्यामुळे याविरोधात दाद मागणे राजस्थानला शक्य नव्हते. यावेळी पंच शमशुद्दीन यांनी लेग अंपायर विनीत कुलकर्णी यांच्याशी सल्लामसलत करून तिसऱ्या पंचांचा रिव्ह्यू घेतला. रिप्लेमध्ये चेंडू टॉम करनच्या बॅटला लागत नसल्याचे दिसत होते. याचसोबत धोनीने चेंडू पकडण्याआधी तो जमिनीवर पडल्याचेही रिप्लेत दिसून आले. त्यामुळे तिसऱ्या पंचांनी टॉम करन नाबाद घोषीत केले.

IPL 2020: Umpires recall Tom Curran after giving out, Dhoni loses cool
धोनी पंचाशी बोलताना...

पंचाच्या या निर्णयावर धोनीने नाराजी व्यक्त केली. तसे पाहिले तर, नियमानुसार मैदानावरील पंचांनी एखाद्या फलंदाजाला बाद ठरवल्यानंतर तिसरे पंच त्यात हस्तक्षेप करू शकत नाही. यामुळे तो पंच शमशुद्दीन यांच्याजवळ जाऊन काही बोलत असल्याचे दिसले. कॅप्टन कूल म्हणून ओळख असलेल्या धोनीचा संतप्त अवतार यावेळी चाहत्यांना पहायला मिळाला. हा सामना राजस्थानने १६ धावांनी जिंकला. राजस्थानने दिलेल्या २१६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईचा संघ २०० धावा करू शकला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.