शारजाह - वृद्धिमान साहाच्या सावध आणि जेसन होल्डरच्या आक्रमक खेळीमुळे सनरायझर्स हैदराबादने बंगळुरूचे छोटेखानी आव्हान पेलत विजय नोंदवला. बंगळुरूच्या १२१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादची दमछाक झाली खरी, मात्र त्यांनी हे आव्हान १४.१ षटकातच पूर्ण केले. वॉर्नर, विल्यम्सन हे फलंदाज अयपशी ठरले. तर, मनीष पांडेने २६ धावांचे योगदान दिले. साहाने ४ चौकार आणि १ षटकारासह ३९ तर, होल्डरने १० चेंडूत नाबाद २६ धावा केल्या. या विजयामुळे हैदराबादने गुणतालिकेत सातव्या स्थानावरून थेट चौथ्या स्थानी झेप घेतली आहे.
-
A 5-wicket win and two crucial points in the bag for @SunRisers 💪💪#Dream11IPL pic.twitter.com/rsuO6svtVx
— IndianPremierLeague (@IPL) October 31, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">A 5-wicket win and two crucial points in the bag for @SunRisers 💪💪#Dream11IPL pic.twitter.com/rsuO6svtVx
— IndianPremierLeague (@IPL) October 31, 2020A 5-wicket win and two crucial points in the bag for @SunRisers 💪💪#Dream11IPL pic.twitter.com/rsuO6svtVx
— IndianPremierLeague (@IPL) October 31, 2020
तत्पूर्वी, सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांनी केलेल्या तिखट माऱ्यासमोर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने २० षटकात १२० धावांपर्यंत मजल मारली. ही धावसंख्या गाठताना बंगळुरूने आपले ७ फलंदाज गमावले. संदीप शर्मा आणि जेसन होल्डर यांनी प्रत्येकी २ बळी घेत बंगळुरूच्या डावाला सुरूंग लावला.
नाणेफक जिंकलेल्या कर्णधार डेव्हिड वॉर्नरने विराटसेनेला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. लीगमध्ये भन्नाट फॉर्मात असलेला देवदत्त पडिक्कल आणि जोश फिलीप यांनी डावाची सुरुवात केली. संदीप शर्माने पडिक्कलला ५ धावांवर त्रिफळाचित करत बंगळुरूला पहिला धक्का दिला. त्यानंतर आलेल्या विराटलाही संदीपने ७ धावांवर माघारी धाडले. फिलीप आणि डिव्हिलियर्सने डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादात डिव्हिलियर्स झेलबाद झाला. त्यानंतर राशिद खानच्या चेंडूवर फिलीपही ३२ धावांवर तंबूत परतला. त्याने ४ चौकार लगावले. वॉशिंग्टन सुंदरच्या २१ धावांमुळे बंगळुरूला शंभरचा आकडा ओलांडता आला. संदीप शर्मा आणि जेसन होल्डरव्यतिरिक्त टी. नटराजन, शाहबाझ नदीम आणि राशिद खान यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
-
Match 52. It's all over! Sunrisers Hyderabad won by 5 wickets https://t.co/CLIIZwApll #RCBvSRH #Dream11IPL #IPL2020
— IndianPremierLeague (@IPL) October 31, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Match 52. It's all over! Sunrisers Hyderabad won by 5 wickets https://t.co/CLIIZwApll #RCBvSRH #Dream11IPL #IPL2020
— IndianPremierLeague (@IPL) October 31, 2020Match 52. It's all over! Sunrisers Hyderabad won by 5 wickets https://t.co/CLIIZwApll #RCBvSRH #Dream11IPL #IPL2020
— IndianPremierLeague (@IPL) October 31, 2020
MATCH UPDATE :
- हैदराबादचा बंगळुरूवर ५ गडी राखून विजय.
- होल्डरच्या नाबाद २६ धावा.
- अब्दुल समद मैदानात.
- हैदराबादचा पाचवा फलंदाज बाद, अभिषेक शर्मा माघारी.
- होल्डर मैदानात.
- विल्यम्सन ८ धावांवर बाद. उडानाला मिळाला बळी.
- ११ षटकानंतर हैदराबादच्या ३ बाद ८२ धावा.
- अभिषेक शर्मा मैदानात.
- साहाच्या ३९ धावा.
- हैदराबादला तिसरा धक्का, चहलच्या चेंडूवर साहा यष्टीचित.
- हैदराबादला विजयासाठी ६० चेंडूत ४७ धावांची गरज.
- १० षटकात हैदराबादच्या २ बाद ७४ धावा.
- केन विल्यम्सन मैदानात.
- चहलला मिळाला पांडेचा बळी.
- हैदराबादला दुसरा धक्का. मनीष पांडे २६ धावांवर बाद.
- सहा षटकानंतर मनीष पांडे २५ तर, साहा २१ धावांवर नाबाद.
- हैदराबादला विजयासाठी ९० चेंडूत ७५ धावांची गरज.
- पाच षटकात हैदराबादच्या १ बाद ४६ धावा.
- हैदराबादला विजयासाठी १०० धावांची गरज.
- तीन षटकानंतर हैदराबादच्या १ बाद २२ धावा.
- मनीष पांडे मैदानात.
- हैदराबादला पहिला धक्का, सुंदरच्या गोलंदाजीवर बाद.
- हैदराबादचे सलामीवीर मैदानात.
- २० षटकात बंगळुरूच्या ७ बाद १२० धावा.
- उडाना शून्यावर बाद, होल्डरचा दुसरा बळी.
- इसुरू उडाना मैदानात.
- बंगळुरूला सहावा धक्का, होल्डरच्या गोलंदाजीवर मॉरिस बाद.
- ख्रिस मॉरिस मैदानात.
- वॉशिंग्टन सुंदर २१ धावांवर बाद, नटराजनला मिळाला बळी.
- १५ षटकानंतर बंगळुरूच्या ४ बाद ९३ धावा.
- १२ षटकानंतर बंगळुरूच्या ४ बाद ७६ धावा.
- गुरकीरत मैदानात.
- फिलीप ३२ धावांवर बाद, राशिद खानने धाडले माघारी.
- वॉशिंग्टन सुंदर मैदानात.
- डिव्हिलियर्स २४ धावांवर बाद, नदीमने केले झेलबाद.
- दहा षटकानंतर बंगळुरूच्या २ बाद ६१ धावा.
- पाच षटकानंतर बंगळुरूच्या २ बाद २९ धावा.
- एबी डिव्हिलियर्स मैदानात.
- विराट झेलबाद, संदीपचा दुसरा बळी.
- विराट कोहली मैदानात.
- संदीप शर्माला मिळाली पडिक्कलची विकेट.
- बंगळुरूला पहिला धक्का, पडिक्कल ५ धावांवर बाद.
- दोन षटकात बंगळुरूच्या बिनबाद ८ धावा.
- संदीप शर्माकडून हैदराबादसाठी सलामीचे षटक.
- बंगळुरूचे सलामीवीर फिलीप-पडिक्कल मैदानात.
- नाणेफेक जिंकून हैदराबादचा गोलंदाजीचा निर्णय.
- थोड्याच वेळात होणार नाणेफेक.
सनरायझर्स हैदराबाद -
डेव्हिड वार्नर (कर्णधार), वृद्धीमान साहा, केन विल्यमसन, मनीष पांडे, राशिद खान, जेसन होल्डर, अभिषेक शर्मा, शाहबाझ नदीम, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, टी. नटराजन.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू -
जोश फिलिप, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली (कर्णधार), एबी डिव्हिलियर्स, गुरकीरत सिंह, ख्रिस मॉरिस, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी, युजवेंद्र चहल, इसुरु उडाना, मोहम्मद सिराज.