ETV Bharat / sports

IPL २०२० : RCB विरुद्ध विजय मिळवल्यानंतर वॉर्नर म्हणाला.... - david warner on kane williamson

एलिमिनेटर सामन्यात हैदराबादने बंगळुरूवर ६ गडी राखून विजय मिळवत क्वालिफायर फेरीत धडक मारली. विजयानंतर हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने गोलंदाजांसह केन विल्यमसनचे कौतुक केले.

ipl 2020 SRH vs rcb : Kane is our banker, says warner
IPL २०२० : RCB विरुद्ध विजय मिळवल्यानंतर वॉर्नर म्हणाला....
author img

By

Published : Nov 7, 2020, 12:45 PM IST

अबुधाबी - आयपीएलच्या तेराव्या हंगामाचा एलिमिनेटर सामना सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियममध्ये शुक्रवारी पार पडला. हैदराबादने या सामन्यात बंगळुरूवर ६ गडी राखून विजय मिळवत क्वालिफायर फेरीत धडक मारली. विजयानंतर हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने गोलंदाजांसह केन विल्यमसनचे कौतुक केले.

काय म्हणाला वॉर्नर -

आरसीबीचा पराभव केल्यानंतर वॉर्नर म्हणाला की, 'मागील काही सामने आमच्यासाठी संघर्षपूर्ण राहिले आहेत. यात आम्हाला गुणतालिकेतील टॉप-३ संघांना पराभूत करावयाचे होते. त्यांचा पराभव करण्यात आम्ही यशस्वी ठरलो. आता पुन्हा त्याच टॉप संघाशी आमची लढत आहे. आम्ही पॉवर प्लेमधील गोलंदाजीविषयी रणनीती बदलली. संदीप शर्मा आणि जेसन होल्डर यांना पाच षटके गोलंदाजी दिली. नटराजन आणि राशिद यांना मधल्या षटकात गोलंदाजीसाठी ठेवले. ही आमची रणनीती यशस्वी ठरली.'

केन विल्यमसनने नाबाद अर्धशतक झळकावत हैदराबादला विजय मिळवून दिला. यावर वॉर्नर म्हणाला, विल्यमसनने अप्रतिम खेळी केली. तो आमच्या संघाचा महत्वाचा खेळाडू आहे. त्याने संघ अडचणीत असताना, चांगली खेळी साकारली. न्यूझीलंडकडून त्याने अशा अनेक खेळ्या केल्या आहेत. विल्यमसनशिवाय आमच्या फिरकी गोलंदाजांनी मधल्या षटकात चांगला मारा केला.

दरम्यान, हैदराबादचा संघ दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात दिल्ली कॅपिटल्सशी झुंजणार आहे. उभय संघातील सामना रविवारी (ता. ८) दुबईमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्याविषयी वॉर्नर म्हणाला, दिल्लीचा संघ शानदार आहे. त्यांच्याकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नावाजलेले गोलंदाज आहेत. तसेच शिखर धवन देखील चांगल्या फार्मात आहे. शिवाय श्रेयस अय्यर सातत्याने धावा करत आहे.

असा रंगला सामना -

बंगळुरुने हैदराबादला १३२ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान विल्यमसन-होल्डर या जोडीने संयमी फलंदाजी करत पूर्ण केले. विल्यमसनने नाबाद अर्धशतक झळकावत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. अखेरच्या षटकापर्यंत मैदानावर टिकून राहत विल्यमसनने नाबाद ५० धावा केल्या. त्याला होल्डरने नाबाद २४ धावा करत मोलाची साथ दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.