शारजाह - आरसीबीच्या विराटेसेनेने ८२ धावांनी विजयश्री खेचून आणली आहे. फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांची भेदक गोलंदाजी आणि त्यांना इतरांनी दिलेली दमदार साथ या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (आरसीबी) शारजाच्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सचा पराभवाची धूळ चारली. १९५ धावसंख्येचे पेलवताना कोलकाता नाईट रायडर्सच्या (केकेआर) फलंदाजांची दमछाक झाली. केकेआरचा संघाला ११२ धावांपुढे झेप घेता आली नाही.
आयपीएलच्या तेराव्या हंगामात आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना फारसा चित्तथरारक ठरला नाही. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतलेल्या बंगळुरूने कोलकातासमोर १९५ धावांचे आव्हान ठेवले आहे. डिव्हिलियर्सच्या तडाखेबंद अर्धशतकामुळे बंगळुरूला दोनशे धावांच्या जवळ पोहोचता आले.
फिंच-पडीक्कलची उत्तम सलामी आणि मधल्या फळीत डिव्हिलियर्सच्या जबरदस्त अर्धशतकामुळे बंगळुरूने कोलकातासमोर २० षटकात २ बाद १९४ धावा केल्या. अॅरोन फिंच आणि देवदत्त पडीक्कल या सलामीवीरांनी बंगळुरूला ६७ धावांची सलामी दिली. पडीक्कल ३२ धावांवर माघारी परतला. तर, फिंचचे अर्धशतक तीन धावांनी हुकले. फिंचच्या खेळीत ४ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. आंद्रे रसेलने या दोन्ही सलामीवीरांचा त्रिफळा उडवला. या दोघांनंतर विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्सने मोर्चा सांभाळला. विराटने संयमी तर, डिव्हिलियर्सने आक्रमक सुरुवात करत धावगती वाढवली. विराटने एक चौकारासह नाबाद ३३ धावा केल्या. तर, डिव्हिलियर्सने ३३ चेंडूत नाबाद ७३ धावा टोलवल्या. त्याच्या खेळीत ६ षटकार आणि ५ चौकारांचा समावेश होता.
LIVE UPDATE :
- केकेआरचा संघ केवळ ११२ धावांचा पल्ला गाठू शकले.
- आरबीसीकडून फलंदाजीत एबी डिव्हीलियर्सचे आक्रमक अर्धशतक निर्णायक ठरले. गोलंदाजांनीही त्यांच्या धावांचे चीज करत विजय संघाला मिळवून दिला.
- रसेल झेलबाद
- कोलकाताला विजयासाठी ४२ चेंडूत १२४ धावांची गरज.
- तेरा षटकानंतर कोलकाताच्या ५ बाद ७१ धावा.
- राहुल त्रिपाठी मैदानात.
- इयान मॉर्गन ८ धावांवर बाद, कोलकाताच्या ५ बाद ६४ धावा.
- आंद्रे रसेल मैदानात.
- कोलकाताचा चौथा धक्का, कार्तिक बाद, चहलच्या गोलंदाजीवर कार्तिक माघारी.
- कोलकाताला विजयासाठी ६० चेंडूत १३४ धावांची गरज.
- दहा षटकानंतर कोलकाताच्या ३ बाद ६१ धावा.
- दिनेश कार्तिक मैदानात.
- कोलकाताचा तिसरा फलंदाज बाद, शुबमन ३४ धावांवर धावबाद.
- इयान मॉर्गन मैदानात.
- कोलकाताला दुसरा धक्का, राणा माघारी, सुंदरच्या गोलंदाजीवर राणा पायचित.
- कोलकाताला विजयासाठी ७८ चेंडूत १४९ धावांची गरज.
- सात षटकानंतर गिल २८ तर राणा ७ धावांवर नाबाद.
- पाच षटकानंतर कोलकाताच्या १ बाद ३९ धावा.
- नितीश राणा मैदानात.
- सैनीने उडवला बँटनचा त्रिफळा, बँटन ८ धावांवर बाद.
- तीन षटकानंतर कोलकाच्या बिनबाद १६ धावा.
- पहिल्या षटकात कोलकाताच्या बिनबाद ७ धावा.
- गिलकडून डावाचा पहिला चौकार.
- ख्रिस मॉरिस टाकतोय बंगळुरूसाठी पहिले षटक.
- टॉम बँटन आणि शुबमन गिल कोलकाताचे सलामीवीर.
- कोलकाताचे सलामीवीर मैदानात.
- २० षटकात बंगळुरूच्या २ बाद १९४ धावा.
- डिव्हिलियर्सच्या ३३ चेंडूत नाबाद ७३ धावा.
- डिव्हिलियर्सचे २३ चेंडूत तुफानी अर्धशतक, खेळीत ५ षटकार आणि ४ चौकारांचा समावेश.
- डिव्हिलियर्सच्या खेळीत ४ षटकार आणि ३ चौकारांचा समावेश.
- १७ षटकानंतर डिव्हिलियर्स २१ चेंडूत ४३ धावांवर नाबाद.
- १६ षटकानंतर डिव्हिलियर्स २६ तर, विराट २० धावांवर नाबाद.
- पंधरा षटकानंतर बंगळुरूच्या २ बाद १११ धावा.
- डिव्हिलियर्स मैदानात.
- फिंच ४७ धावांवर बाद, प्रसिद्ध कृष्णाने उडवला त्रिफळा.
- दहा षटकानंतर बंगळुरूच्या १ बाद ७८ धावा.
- रसेलने उडवला पडीक्कलचा त्रिफळा. विराट मैदानात.
- बंगळुरूला पहिला धक्का, पडीक्कल ३२ धावांवर बाद.
- सात षटकानंतर फिंचच्या ३२ तर, पडीक्कलच्या नाबाद २५ धावा.
- पाच षटकानंतर बंगळुरूच्या बिनबाद ४१ धावा.
- फिंच-पडीक्कलची आक्रमक सुरुवात.
- फिंचकडून डावाचा पहिला षटकार.
- पहिल्या षटकात बंगळुरूच्या बिनबाद ८ धावा.
- फिंचकडून डावाचा पहिला चौकार.
- पॅट कमिन्स टाकतोय कोलकाताकडून पहिले षटक.
- बंगळुरूचे सलामीवीर पडीक्कल-फिंच मैदानात.
- विराटने जिंकली नाणेफेक, प्रथम करणार फलंदाजी.
- थोड्याच वेळात होणार नाणेफेक
बंगळुरू आणि कोलकाता या संघांमध्ये आतापर्यंत २४ सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी १० सामन्यात बंगळुरूने तर, १४ सामन्यात कोलकाताने बाजी मारली आहे. आजच्या सामन्यात पुन्हा एकदा आरसीबीने केकेआरला पराभूत केले आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची प्लेईंग XI -
विराट कोहली (कर्णधार), एबी डिव्हिलियर्स, अॅरोन फिंच, ख्रिस मॉरिस, मोहम्मद सिराज, देवदत्त पडीक्कल, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, इसुरू उडाना.
कोलकाता नाइट रायडर्सची प्लेईंग XI -
दिनेश कार्तिक (कर्णधार ), आंद्रे रसेल, कमलेश नागरकोटी, नितीश राणा, प्रसिद्ध कृष्णा, शुबमन गिल, पॅट कमिंन्स, इयान मॉर्गन, वरुण चक्रवर्ती, टॉम बँटन, राहुल त्रिपाठी.