दुबई - राजस्थान रॉयल्स संघाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राजस्थानचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स आयपीएल खेळण्यासाठी आज यूएईमध्ये दाखल होणार आहे. स्टोक्समुळे राजस्थानचा संघ आणखी मजबूत झाला आहे.
वडील आजारी असल्याने, बेन स्टोक्सने सुरुवातीचे काही सामने आपण खेळणार नसल्याचे, राजस्थानच्या व्यवस्थापनाला कळवले होते. आता तो आयपीएल खेळण्यासाठी यूएईमध्ये दाखल होणार आहे. राजस्थान संघाचा मार्गदर्शक शेन वॉर्नने याची माहिती दिली.
यूएईमध्ये दाखल झाल्यानंतर बेन स्टोक्सला ६ दिवस क्वारंटाइन राहावे लागेल. क्वारंटाइन दरम्यान, त्याच्या चाचण्या घेतल्या जातील, त्यात निगेटिव्ह आल्यानंतर त्याला बायो बबलमध्ये प्रवेश करण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे.
सध्याच्या घडीला मुंबई इंडियन्सचा संघ अव्वल स्थानावर विराजमान आहे. यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर अनुक्रमे दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्सचा संघ आहे. चेन्नईविरुद्धच्या विजयानंतर हैदराबादचा संघ चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. त्यानंतर पाचव्या स्थानावर राजस्थान रॉयल्सचा संघ आहे. सहाव्या स्थानावर विराटचा आरसीबी संघ आहे. गुणातालिकेत सातव्या स्थानावर किंग्ज इलेव्हन पंजाब आहे.
हेही वाचा - IPL २०२० : राजस्थानसमोर बंगळुरूचे आव्हान, विराटच्या कामगिरीवर नजरा
हेही वाचा - IPL २०२० : आज पुन्हा शाहजाहच्या मैदानावर धावांचा पाऊस?, केकेआर-दिल्ली यांच्यात लढत