ETV Bharat / sports

IPL २०२० : गुणातालिकेत राजस्थानची 'रॉयल' उडी, पाहा काय झाले बदल...

पहिल्या नऊ सामन्यानंतर गुणतालिकेमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दोन विजयासह पहिल्या स्थानावर आहे. तर राजस्थान रॉयल्सनेही दोन विजय मिळवले आहेत. पण नेट रनरेटच्या हिशोबाने दिल्ली कॅपिटल्स राजस्थान रॉयल्सपेक्षा सरस असल्याने दोघांकडेही चार गुण असले तरी दिल्ली अव्वल स्थानी आहे. तर राजस्थान दुसऱ्या स्थानावर आहे.

IPL 2020 Points Table Latest Update After RR vs KXIP
IPL २०२० : गुणातालिकेत राजस्थानची 'रॉयल' उडी, पाहा काय झाले बदल...
author img

By

Published : Sep 28, 2020, 10:35 AM IST

मुंबई - मयांक अगरवालचं शतक आणि केएल राहुलचे अर्धशतक यांच्या जोरावर पंजाबने राजस्थानला २२४ धावांचे आव्हान दिले. तेव्हा राजस्थानने शारजाहच्या मैदानात षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करत आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करत सामना ४ गडी राखून जिंकला. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेला हा सामना चांगलाच रंगतदार ठरला. या सामन्यात राजस्थानने विजय मिळवल्यावर गुणतालिकेत मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळाले.

पहिल्या नऊ सामन्यांनंतर गुणतालिकेमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दोन विजयासह पहिल्या स्थानावर आहे. तर राजस्थान रॉयल्सनेही दोन विजय मिळवले आहेत. पण नेट रनरेटच्या हिशोबाने दिल्ली कॅपिटल्स राजस्थान रॉयल्सपेक्षा सरस असल्याने दोघांकडेही चार गुण असले तरी दिल्ली अव्वल स्थानी आहे. तर राजस्थान दुसऱ्या स्थानावर आहे.

पंजाब, मुंबई, कोलकात्ता, चेन्नई, बंगळुरु हे पाचही संघांनी प्रत्येकी एका विजयासहीत दोन गुण मिळवले आहेत. पंजाबचा संघ राजस्थानविरुद्धच्या सामन्यापूर्वी दुसऱ्या स्थानावर होता. कारण यापूर्वी झालेल्या दोन सामन्यांपैकी पंजाबने एक सामना जिंकता होता, तर एका सामन्यात त्यांचा पराभव झाला होता. आजच्या तिसऱ्या सामन्यात पंजाबच्या संघाला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आता पंजाबचा संघ हा तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सचा संघ हा तिसऱ्यावरून चौथ्या स्थानावर घसरला आहे.

पाचव्या क्रमांकावर कोलकाता, सहाव्या क्रमांकावर चेन्नई आणि सातव्या क्रमांकावर बंगळुरुचा संघ आहे. स्पर्धेत आपले पहिले दोन्ही सामने गमावल्याने हैदराबाद गुणतालिकेमध्ये भोपळाही फोडता न आल्याने तळाशी आहे.

राजस्थानची 'रॉयल' उडी -

राजस्थानचा संघ पंजाबविरुद्धच्या सामन्यापूर्वी चौथ्या स्थानावर होता. दिल्ली, पंजाब आणि मुंबई यांच्यानंतर राजस्थानचा चौथा क्रमांक येत होता. पण राजस्थानने या विजयानंतर थेट चौथ्या क्रमांकावरून दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. राजस्थानने आपल्या दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.