अबुधाबी - आयपीएलच्या तेराव्या हंगामात आज ४८वा सामना अबुधाबीच्या शेख झायेद मैदानावर रंगत आहे. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात हा सामना होत असून दोन्ही संघांचे लक्ष्य प्ले-ऑफ फेरीतील स्थान पक्के करण्याकडे होते. मुंबईचा कर्णधार कायरन पोलार्डने नाणेफेक जिंकत बंगळुरूला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. बंगळुरूने पडिक्कलच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर २० षटकात ६ बाद १६४ धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना सूर्यकुमार यादवने तुफान फटकेबाजी करत नाबाद ७९ धावा केल्या आणि संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह मुंबईने १६ गुणांसह मालिकेत अव्वल स्थान पटकावले.
-
That's that from Match 48 as @mipaltan win by 5 wickets.@surya_14kumar with an unbeaten 79.
— IndianPremierLeague (@IPL) October 28, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Scorecard - https://t.co/XWqNw97Zzc #Dream11IPL pic.twitter.com/ESHhCYRBik
">That's that from Match 48 as @mipaltan win by 5 wickets.@surya_14kumar with an unbeaten 79.
— IndianPremierLeague (@IPL) October 28, 2020
Scorecard - https://t.co/XWqNw97Zzc #Dream11IPL pic.twitter.com/ESHhCYRBikThat's that from Match 48 as @mipaltan win by 5 wickets.@surya_14kumar with an unbeaten 79.
— IndianPremierLeague (@IPL) October 28, 2020
Scorecard - https://t.co/XWqNw97Zzc #Dream11IPL pic.twitter.com/ESHhCYRBik
सुरुवातीला आक्रमक झालेल्या बंगळुरूला जसप्रीत बुमराहने वेसण घालत २० षटकात १६४ धावांवर रोखले. नाणेफेक जिंकलेल्या मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला फलंदाजीचे आमंत्रण दिले. बंगळुरूने अॅरोन फिंचच्या जागी संघात स्थान दिलेल्या जोश फिलीपला देवदत्त पडिक्कलसोबत सलामीला पाठवले. या दोघांनी ७१ धावांची दमदार सलामी दिली. फिलीप ३३ धावांवर असताना फिरकीपटू राहुल चहरच्या गोलंदाजीवर यष्टीचित झाला. त्यानंतर आलेला विराट कोहलीही अपयशी ठरला.
विराटला बुमराहने बाद करत आयपीएलमधील १०० बळींची संख्या पूर्ण केली. एबी डिव्हिलियर्स आणि पडिक्कल आक्रमक होणार असे दिसताना कर्णधार कायरन पोलार्डने चेंडू आपल्या हाती घेतला. त्याने डिव्हिलियर्सचा १५ धावांवर काटा काढला. तर, शिवम दुबे आणि पडीक्कलला बुमराहने सतराव्या षटकात बाद केले. पडीक्कलने ४५ चेंडूत १२ चौकार आणि एका षटकारासह ७४ धावा केल्या. यानंतर मात्र, बंगळुरूच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. मुंबईकडून बुमराहने ४ षटकात १४ धावा देत ३ फलंदाज बाद केले. तर, बोल्ट, चहर आणि पोलार्डला प्रत्येकी एक बळी घेता आला.
LIVE UPDATE :
- मुंबईचा विराटसेनेवर पाच गडी राखून विजय
- मुंबईचे प्ले-ऑफ स्थान निश्चित
- मुंबईला ३७ चेंडूत ५८ धावांची गरज
- हार्दिक पांडया मैदानात.
- चहलचा दुसरा बळी, कृणाल १० धावांवर झेलबाद.
- कृणाल पांड्या मैदानात.
- सिराजच्या गोलंदाजीवर सौरभ बाद, पडिक्कलने घेतला अफलातून झेल.
- दहा षटकानंतर बंगळुरूच्या २ बाद ७० धावा.
- सौरभ तिवारी मैदानात.
- मुंबईला दुसरा धक्का, किशनन २५ धावांवर बाद, चहलने घेतला बळी.
- सहा षटकानंतर मुंबईच्या १ बाद ४५ धावा.
- सूर्यकुमार मैदानात.
- मुंबईला पहिला धक्का, सिराजच्या गोलंदाजीवर डी कॉक १८ धावांवर माघारी.
- पाच षटकात मुंबईच्या बिनबाद ३६ धावा.
- पहिल्या षटकात मुंबईच्या बिनबाद ५ धावा.
- किशनकडून डावाचा पहिला चौकार.
- ख्रिस मॉरिस टाकतोय बंगळुरूसाठी सलामीचे षटक.
- मुंबईचे सलामीवीर डी कॉक-किशन मैदानात.
- २० षटकात बंगळुरूच्या ६ बाद १६४ धावा.
- मॉरिस ४ धावावंर बाद, बोल्टला मिळाला बळी.
- १७ षटकानंतर बंगळुरूच्या ५ बाद १३४ धावा.
- गुरकिरत-मॉरिसची जोडी मैदानात.
- पडिक्कलच्या खेळीत १२ चौकार आणि १ षटकाराचा समावेश.
- पडिक्कल ७४ धावांवर झेलबाद, बुमराहचा तिसरा बळी.
- बुमराहचा दुसरा बळी, दुबे झेलबाद.
- शिवम दुबे मैदानात.
- पोलार्डच्या गोलंदाजीवर डिव्हिलियर्स झेलबाद.
- पंधरा षटकानंतर बंगळुरूच्या २ बाद १२९ धावा.
- एबी डिव्हिलियर्स मैदानात.
- बुमराहकडून विराट झेलबाद, ९ धावांवर माघारी.
- पडिक्कलचे अर्धशतक, खेळीत १० चौकार.
- दहा षटकानंतर बंगळुरूच्या १ बाद ८८ धावा.
- देवदत्त पडिक्कल अर्धशतकाच्या जवळ.
- विराट कोहली मैदानात.
- जोश फिलीप ३३ धावांवर यष्टीचित, राहुल चहरला मिळाला बळी.
- सहा षटकानंतर पडिक्कल २९ तर फिलीप २५ धावांवर नाबाद.
- पाच षटकात बंगळुरूच्या बिनबाद ४२ धावा.
- पहिल्या षटकात बंगळुरूच्या बिनबाद ५ धावा.
- पडिक्कलकडून डावाचा पहिला चौकार.
- ट्रेंट बोल्ट टाकतोय सलामीचे षटक.
- बंगळुरूचे सलामीवीर पडिक्कल-फिलीप मैदानात.
- मुंबईचा गोलंदाजीचा निर्णय.
- नाणेफेकीचा कौल मुंबईच्या बाजूने
- थोड्याच वेळात होणार नाणेफेक.
मुंबई इंडियन्स -
कायरन पोलार्ड (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), सौरभ तिवारी, जसप्रीत बुमराह, क्रुणाल पंड्या, राहुल चहर, हार्दिक पांड्या, इशान किशन, ट्रेंट बोल्ट, सूर्यकुमार यादव, जेम्स पॅटिन्सन.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू -
देवदत्त पडिक्कल, विराट कोहली (कर्णधार), एबी डिव्हिलियर्स, गुरकीरत सिंह, ख्रिस मॉरिस, वॉशिंग्टन सुंदर, डेल स्टेन, युजवेंद्र चहल, जोश फिलिप (यष्टीरक्षक), मोहम्मद सिराज, शिवम दुबे.