लंडन - इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस वोक्सने आयपीएलमधून माघार घेतली आहे. १३ वे सत्र सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. अशात वोक्सने घेतलेल्या निर्णयाने दिल्ली कॅपिटल्स संघाला मोठा धक्का बसला आहे.
दिल्ली कॅपिटल्स संघाने ख्रिस वोक्सवर १.५ कोटी रुपयांची बोली लावून आपल्या संघात घेतले होते. मात्र, एका संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, वोक्सने दिल्ली कॅपिटल्सच्या व्यवस्थापनाला आपला पर्याय शोधण्यास सांगितलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वोक्सने इंग्लिश समरसाठी तंदुरुस्त राहण्यासाठी त्याने हा निर्णय घेतला. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्स संघाकडून अजून या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही.
आयपीएलच्या १३ हंगामाला २९ मार्चापासून सुरुवात होणार आहे. पण या स्पर्धेवर कोरोना विषाणूचे संकट आहे. कोरोनामुळे आयपीएल पुढे ढकलण्यात येणार असल्याची, चर्चा सुरू आहे.
असा आहे दिल्ली कॅपिटल्सचा संघ -
श्रेयस अय्यर, रिषभ पंत, शिखर धवन, कागिसो रबाडा, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, आर अश्विन, इशांत शर्मा, अमित मिश्रा, किमो पॉल, एच पटेल, अक्षर पटेल, एस लामिचाने, ए खान, जेसन रॉय, अॅलेक्स केरी, शिमरोन हेटमायर, मोहित शर्मा, तुषार देशपांडे, मार्कस स्टॉयनिस, एल यादव.
हेही वाचा - रणजीचा 'सचिन'..! वसिम जाफरची क्रिकेटमधून निवृत्ती
हेही वाचा - कोरोना व्हायरसमुळे आयपीएलवर टांगती तलवार, आरोग्यमंत्री टोपेंनी दिले संकेत