शारजाह - आयपीएल २०२०च्या रणसंग्रामाला सुरूवात झाली असून अबुधाबी आणि दुबई येथे सुरूवातीचे एकूण तीन सामने आतापर्यंत पार पडले आहेत. आज शारजाहमध्ये राजस्थान रॉयल आणि चेन्नई सुपर किंग्ज आमने-सामने होतील. चेन्नई या हंगामातील दुसरा तर राजस्थान पहिला सामना खेळत आहे.
गतविजेत्या मुंबई इंडियन्सला सलामीच्या सामन्यात धूळ चारत चेन्नईने विजयी सुरूवात केली आहे. यानंतर आज ते राजस्थानशी भिडतील. चेन्नईचा संघ विजयी संघात कोणताही बदल करण्याची शक्यता कमी आहे. मागील सामन्याप्रमाणे डावाची सुरूवात शेन वॉटसन आणि मुरली विजय करतील. त्यानंतर मधल्या फळीची धुरा अंबाटी रायुडू, फाफ डु प्लेसिस, केदार जाधव, महेद्र सिंह धोनी हे सांभाळतील. गोलंदाजीची कमान रविंद्र जडेजा, सॅम करन, पीयूष चावला, दीपक चहर आणि लुंगी एनगिडी यांच्यावर असेल.
दुसरीकडे राजस्थानचा संघ स्फोटक बेन स्टोक्सच्या अनुपस्थितीत पहिला सामना खेळणार आहे. राजस्थानकडून यशस्वी जैस्वाल आणि रॉबिन उथप्पा सलामीला येऊ शकतात. मध्यल्या फळीत संजू सॅमसन, स्टिव स्मिथ, डेव्हिड मिलर, महिपाल लोमरोर, रियान पराय यांना संधी मिळू शकते. राजस्थान जयदेव उनाडकट, जोफ्रा आर्चर, श्रेयश गोपाल, टॉम करन या गोलंदाजासह मैदानात उतरू शकते.
- राजस्थान रॉयल्सचा संभाव्य संघ -
- यशस्वी जैस्वाल, रॉबिन उथप्पा, स्टिव स्मिथ (कर्णधार), डेव्हिड मिलर, संजू सॅमसन, महिपाल लोमरोर, रियान पराग, जयदेव उनादकट, जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाल आणि टॉम करन
- चेन्नई सुपर किंग्जचा संभाव्य संघ -
- मुरली विजय, फाफ डु प्लेसिस, शेन वाटसन, अंबाटी रायुडू, महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), केदार जाधव, रविंद्र जडेजा, सॅम करन, दीपक चहर, लुंगी एनगिदी, पीयूष चावला