अबुधाबी - चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना राजस्थानला १२७ धावांचे आव्हान दिले होते. याबदल्यात राजस्थानने सात गडी राखून ते पूर्ण केले. १२७ धावांचा पाठलाग करताना राजस्थानकडून जोस बटलरने शानदार नाबाद अर्थशतक झळकवले. त्याने ४८ चेंडूंत दोन षटकार आणि सात चौकारांसह ७० धावा केल्या. त्याला स्टीव्ह स्मिथने चांगली साथ दिली. स्मिथने ३४ चेंडूत २७ धावा केल्या. तर त्या पाठोपाठ बेन स्टोक्सने ११ चेंडूत १९ धावा केल्या. मात्र, संजू सॅमसन आज आपली जादू दाखवू शकला नाही. तो शून्यवरच बाद झाला.
चेन्नईकडून गोलदांजी करताना दीपक चहरने चार षटकांत १८ धावा देत दोन बळी टिपले. तर जोश हॉजलवूड याने चार षटकांत १९ धावा देत एक गडी बाद केला. सामनावीराच्या पुरस्कार राजस्थानच्या जोस बटरला देण्यात आला.
आयपीएलच्या तेराव्या हंगामात सोमवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेल्या सामन्यात चेन्नईने राजस्थानला विजयासाठी १२६ धावांचे आव्हान दिले आहे. आयपीएलच्या गुणतालिकेतील दोन्ही संघांची स्थिती तशी सारखीच आहे. त्यामुळे बाद फेरीचे आव्हान शाबूत ठेवण्यासाठी दोन्ही संघांना विजय अत्यावश्यक होता. यात राजस्थानने बाजी मारली.
तत्पूर्वी, राजस्थानच्या भेदक गोलंदाजीसमोर चेन्नईने २० षटकात ५ बाद १२५ धावा केल्या. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या चेन्नईची सुरुवात खराब झाली. संघाची धावसंख्या १३ फाफ डु प्लेसिस (१०) आर्चरच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. तर, त्यानंतर आलेल्या शेन वॉटसनला (८) युवा कार्तिक त्यागीने बाद केले. एका बाजूने झुंज देत असलेला सलामीवीर सॅम करनला (२२) श्रेयस गोपालले आपल्या फिरकीत अडकवले. अष्टपैलू खेळाडू अंबाटी रायुडूही आज अपयशी ठरला.
चेन्नईचे चार फलंदाज बाद झाले असताना रवींद्र जडेजा आणि महेंद्रसिंह धोनी या फलंदाजांनी भागिदारी रचली. या दोघांमुळे चेन्नईचे शतक फलकावर लागले. अठराव्या षटकात चोरटी धाव घेताना धोनी २८ धावांवर धावबाद झाला. राजस्थानच्या गोलंदाजांनी चेन्नईच्या फलंदाजांवर पूर्णपणे वर्चस्व राखले. डाव संपला तेव्हाव जडेजा ४ चौकारांसह ३५ धावांवर नाबाद राहिला. आर्चर, त्यागी, गोपाल, आणि तेवतिया यांना प्रत्येकी एक बळी घेता आला.
LIVE UPDATE :
- राजस्थानची चेन्नईवर ७ गड्यांनी मात.
- सतराव्या षटकांत राजस्थानच्या ३ बाद १२४
- सोळाव्या षटकांत राजस्थानच्या ३ बाद ११२ धावा.
- पंधरा षटकांनंतर राजस्थानच्या ३ बाद १०८ धावा.
- १५व्या षटकांत बटलरचे चौकार मारुन ३७ चेंडूत अर्धशतक.
- चौदा षटकानंतर राजस्थानच्या ३ बाद ९२ धावा.
- दहा षटकानंतर राजस्थानच्या ३ बाद ५९ धावा.
- राजस्थानला ७२ चेंडूत ८३ धावांची गरज.
- आठ षटकानंतर राजस्थानच्या ३ बाद ४३ धावा.
- पाच षटकानंतर राजस्थानच्या ३ बाद २८ धावा.
- जोस बटलर मैदानात.
- चहरचा दुसरा बळी, संजू सॅमसन शून्यावर माघारी.
- चार षटकानंतर राजस्थानच्या २ बाद २८ धावा.
- स्टिव्ह स्मिथ मैदानात.
- राजस्थानला दुसरा धक्का उथप्पा झेलबाद, हेझलवुडला मिळाला बळी.
- संजू सॅमसन मैदानात.
- चहरच्या गोलंदाजीवर स्टोक्स १९ धावांवर बाद.
- पहिल्या षटकात राजस्थानच्या बिनबाद १० धावा.
- स्टोक्सच्या बॅटमधून पहिला चौकार.
- दीपक चहर टाकतोय चेन्नईसाठी पहिले षटक.
- राजस्थानचे सलामीवीर मैदानात.
- २० षटकात चेन्नईच्या ५ बाद १२५ धावा.
- जडेजा ३५ धावांवर नाबाद.
- केदार जाधव मैदानात.
- चेन्नईचा अर्धा संघ तंबूत.
- धोनी २८ धावा करून धावबाद.
- १७ षटकानंतर धोनी आणि जडेजाच्या प्रत्येकी २२ धावा.
- १७ षटकानंतर चेन्नई शंभरपार.
- १४ षटकानंतर धोनी १४ तर, जडेजा १६ धावांवर नाबाद.
- चौदा षटकानंतर चेन्नईच्या ४ बाद ८५ धावा.
- दहा षटकानंतर चेन्नईच्या ४ बाद ५६ धावा.
- रवींद्र जडेजा मैदानात.
- तेवतियाने रायुडूला १३ धावांवर धाडले माघारी.
- दहाव्या षटकात अंबाटी रायुडू बाद.
- महेंद्रसिंह धोनी मैदानात.
- श्रेयस गोपालच्या गोलंदाजीवर करन २२ धावांवर बाद.
- पाच षटकानंतर चेन्नईच्या २ बाद ४१ धावा.
- अंबाटी रायुडू मैदानात.
- कार्तिक त्यागीला मिळाली वॉसनची विकेट.
- चेन्नईला दुसरा धक्का, वॉटसन८ धावांवर माघारी.
- शेन वॉटसन मैदानात.
- आर्चरला मिळाली प्लेसिसची विकेट.
- चेन्नईला पहिला धक्का, प्लेसिस बाद.
- प्लेसिसकडून डावाचा पहिला चौकार.
- चेन्नईच्या पहिल्या षटकात बिनबाद २ धावा.
- जोफ्रा आर्चर टाकतोय राजस्थानकडून पहिले षटक.
- चेन्नईचे सलामीवीर करन-प्लेसिस मैदानात.
- धोनीने जिंकली नाणेफेक, प्रथम करणार फलंदाजी.
- थोड्याच वेळात होणार नाणेफेक.
चेन्नईचा संघ -
फाफ डु प्लेसिस, शेन वॉटसन, अंबाटी रायुडू, महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), सॅम करन, केदार जाधव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, दीपक चहर, पीयूष चावला, जोश हेझलवुड.
राजस्थानचा संघ -
स्टिव्ह स्मिथ (कर्णधार), जोस बटलर, बेन स्टोक्स, संजू सॅमसन, रॉबिन उथप्पा, राहुल तेवतिया, श्रेयस गोपाल, कार्तिक त्यागी, रियान पराग, जोफ्रा आर्चर, अंकित राजपूत.