मुंबई - आयपीएलच्या १३ हंगामाला १९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच सुरेश रैनाने अचानक माघार घेत चेन्नई सुपर किंग्जला धक्का दिला. रैनानंतर आता रॉयल चॅलेंजर बंगळुरू संघातील एका खेळाडूंने आयपीएलमधून माघार घेतली आहे. विराट कोहलीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
आरसीबीचा २६ वर्षीय स्टार गोंलदाज केन रिचर्ड्सन आयपीएलमधून बाहेर पडला आहे. आरसीबीने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. रिचर्ड्सनने कौटुंबीक कारणासाठी माघार घेतली आहे. रिचर्ड्सनची पत्नी गरोदर असून तो लवकरच बाप होणार आहे. यामुळे त्याने कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी माघार घेतली आहे. आरसीबीने २०१६ मध्ये रिचर्ड्सनला आपल्या संघात घेतले होते. त्यानंतर डिसेंबर २०२० मध्ये पार पडलेल्या लिलावात आरसीबीने रिचर्ड्सनला चार कोटी रुपयात खरेदी केले होते.
रिचर्ड्सनच्या जागेवर 'या' खेळाडूची वर्णी -
रिचर्ड्सनच्या आयपीएलमधून माघारनंतर कोणता खेळाडू त्याची जागा घेणार हा प्रश्न उपस्थित झाला होता. तेव्हा आरसीबीने रिचर्ड्सनच्या जागेवर ऑस्ट्रेलियाचा लेग स्पिनर अॅडम झम्पा खेळणार, असे स्पष्ट केले आहे. आयपीएलच्या २०२० च्या लिलावात झम्पा अनसोल्ड राहिला होता. त्याची बेस प्राइस १.५ कोटी रुपये होती.
-
We’re thrilled to welcome Adam Zampa in RCB colours. He replaces Kane Richardson. Let’s #PlayBold Adam Zampa. 🤜🤛#PlayBold #IPL2020 #WeAreChallengers pic.twitter.com/63rnT8SvSV
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) August 31, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">We’re thrilled to welcome Adam Zampa in RCB colours. He replaces Kane Richardson. Let’s #PlayBold Adam Zampa. 🤜🤛#PlayBold #IPL2020 #WeAreChallengers pic.twitter.com/63rnT8SvSV
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) August 31, 2020We’re thrilled to welcome Adam Zampa in RCB colours. He replaces Kane Richardson. Let’s #PlayBold Adam Zampa. 🤜🤛#PlayBold #IPL2020 #WeAreChallengers pic.twitter.com/63rnT8SvSV
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) August 31, 2020
दरम्यान, अॅडम झम्पाचा आरसीबीच्या संघात समावेश झाल्याने, आरसीबीची फिरकी बाजू भक्कम झाली आहे. कारण आरसीबीमध्ये युझवेंद्र चहल, मोईन अली आणि पवन नेगी सारखे दर्जेदार फिरकीपटू गोलंदाज आहेत. यात झम्पाची भर पडल्याने संघाची फिरकी बाजू आणखी मजबूत झाली आहे.
हेही वाचा - IPL च्या वेळापत्रकात बदल? सलामीचा सामना मुंबई आणि बंगळुरू यांच्यात रंगण्याची शक्यता
हेही वाचा - IPL २०२० : 'हे' ३ खेळाडू सुरेश रैनाची जागा घेऊ शकतात; यातील एक आहे आयपीएलचा दिग्गज