ETV Bharat / sports

RCB VS KXIP : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला सलग तिसरा विजय मिळवण्याची संधी - IPL 2019

हा सामना जिंकून प्लेऑफच्या आशा जिंवत ठेवण्याचे आव्हान पंजाबसमोर असेल

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि किंग्ज इलेव्हन पंजाब आमने-सामने
author img

By

Published : Apr 24, 2019, 2:38 PM IST

बंगळुरू - आयपीएलमध्ये आज 42 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि किंग्ज इलेव्हन पंजाब आमने-सामने येणार आहेत. हा सामना आज रात्री ८ वाजता बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळण्यात येणार आहे. मागच्या दोन सामन्यात सलग विजय मिळवणाऱ्या विराटच्या आरसीबीकडे पंजाबविरुद्ध विजय मिळवून विजयाची हॅट्रिक करण्याची संधी असणार आहे. तर हा सामना जिंकून प्लेऑफच्या आशा जिंवत ठेवण्याचे आव्हान पंजाबसमोर असेल

पंजाबच्या संघाकडे लोकेश राहुल आणि ख्रिस गेल यांच्यासारखे दमदार फलंदाजी करणारे खेळाडू आहेत. आयपीएलच्या बाराव्या सत्रात या दोन्ही फलंदाजांनी पंजाबसाठी दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे बंगळुरूच्या गोलंदाजांसमोर या दोघांना लवकर बाद करण्याचे आव्हान असणार आहे. पंजाबच्या गोलंदाजीची जबाबदारी ही कर्णधार रवीचंद्रन अश्विन, सॅम कुरन, मोहम्मद शमी आणि अँड्र्यू टाय यांच्यावर असेल.

बंगळुरूची फलंदाजीची मदार विराट कोहली, ए.बी. डिव्हिलियर्स आणि पार्थिव पटेलवर असेल तर गोलंदाजीची जबाबदारी नव्याने दाखल झालेला दिग्गज वेगवान गोलंदाज डेल स्टेन, उमेश यादव आणि यजुर्वेद्र चहल यांच्यावर असेल. मार्कस स्टॉइनिस आणि मोईन अली हे अष्टपैलू खेळाडू कशी कामगिरी करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. गुणतालिकेचा विचार केला तर, पंजाब 10 गुणांसह पाचव्या तर आरसीबी ६ गुणांसह आठव्या स्थानी आहे.

किंग्ज इलेव्हन पंजाब - रवीचंद्रन अश्विन (कर्णधार), केएल राहुल, मयांक अगरवाल, अंकित राजपूत, करुण नायर, मंदिप सिंग, ख्रिस गेल, अँड्र्यू टाय, मुजीब उर रेहमान, करुण नायर, डेव्हिड मिलर, मोजेस हेन्रीक, निकोलास पूरन, वरुण चक्रवर्थी, सॅम करन, मोहम्मद शमी, सर्फराज खान, हार्डस विलजोन, अर्शदीप सिंग, दर्शन नालकांडे, प्रभसिमरन सिंग, अग्निवेश अयाची, हरप्रीत ब्रार, मुरुगन अश्विन.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु -विराट कोहली (कर्णधार), एबी डी’व्हिलियर्स, पार्थिव पटेल (यष्टीरक्षक) हेन्रिच क्लासिन (यष्टीरक्षक), मार्कस स्टॉइनिस, शिम्रॉन हेटमायर, शिवम दुबे, डेल स्टेन, वॉशिंग्टन सुंदर, उमेश यादव, यजुर्वेद्र चहल, मोहम्मद सिराज,मोईन अली, कॉलिन डी ग्रॅण्डहोमी, पवन नेगी, टिम साऊदी, आकाशदीप नाथ, मिलिंद कुमार, देवदूत पडिक्कल, गुरकिराट सिंग, प्रयास राय बर्मन, कुलवंत केजरोलिया, नवदीप सैनी, हिम्मत सिंग

Intro:Body:Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.