ETV Bharat / sports

''गावस्करांच्या 10 हजार धावा आज 15 हजारांच्या बरोबरीच्या''

इंझमामने आपल्या यूट्यूब चॅनलवर सांगितले, "त्यांच्या काळात आणि त्याआधीही खूप चांगले खेळाडू होते. जावेद मियांदाद, व्हिवियन रिचर्ड्स, गॅरी सोबर्स आणि डॉन बॅडमन हे क्रिकेटपटू होतेच. पण कोणालाही आकडेवारीचा विचार नव्हता. आज क्रिकेट भरपूर प्रमाणात होत असले तरीही कमी खेळाडूंनी हा पल्ला गाठला आहे.''

author img

By

Published : Jul 17, 2020, 2:24 PM IST

Inzamam ul haq praises sunil gavaskar in his new youtube video
''गावस्करांच्या 10 हजार धावा आज 15 हजारांच्या बरोबरीच्या''

लाहोर - पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हकने आपल्या नव्या यूट्यूब व्हिडिओमध्ये भारताचे दिग्गज माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांचे कौतुक केले आहे. ज्या काळात धावा बनवणे सोपे नव्हते, त्या काळात गावस्कर यांनी दहा हजार धावा टोलवल्या, असे इंझमाम म्हणाला.

इंझमामने आपल्या यूट्यूब चॅनलवर सांगितले, "त्यांच्या काळात आणि त्याआधीही खूप चांगले खेळाडू होते. जावेद मियांदाद, व्हिवियन रिचर्ड्स, गॅरी सोबर्स आणि डॉन बॅडमन हे क्रिकेटपटू होतेच. पण कोणालाही आकडेवारीचा विचार नव्हता. आज क्रिकेट भरपूर प्रमाणात होत असले तरीही कमी खेळाडूंनी हा पल्ला गाठला आहे.''

तो पुढे म्हणाला, "जर तुम्ही मला विचारले तर मी म्हणेन की त्यावेळी सुनील गावस्कर यांच्या दहा हजार धावा आजच्या 15-16 हजार धावांच्या बरोबरीच्या आहेत. यापेक्षाही जास्त असू शकतात. पण कमी असू शकत नाहीत."

गावस्कर यांनी भारताकडून 122 कसोटी सामने खेळले असून त्यात त्यांनी 10122 धावा केल्या आहेत. त्यांनी 108 एकदिवसीय सामन्यात 3092 धावा ठोकल्या आहेत.

इंझमाम म्हणाला, "जर फलंदाजाचा फॉर्म चांगला असेल तर तुम्ही एका हंगामात 1000-1500 धावा करू शकता, परंतू गावस्कर फलंदाजी करायचे तेव्हा परिस्थिती तशी नव्हती. आजच्या युगात फलंदाजीच्या खेळपट्ट्या पूर्णपणे वेगळ्या बनवल्या जातात. तुम्ही सहज धावा करू शकता. आयसीसीलाही फलंदाजांनी धावा कराव्यात, अशी इच्छा आहे जेणेकरुन प्रेक्षकांना मजा येईल. परंतु यापूर्वी खेळपट्ट्यांवर फलंदाजी करणे सोपे नव्हते, विशेषत: जेव्हा आपण उपखंडाबाहेर खेळत असता."

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.