नागपूर - दीपक चहरच्या स्वप्नवत हॅट्ट्रिकच्या जोरावर भारताने तिसऱ्या टी-२० सामन्यात बांगलादेशला ३० धावांनी मात दिली. या विजयामुळे टीम इंडियाने तीन टी-२० सामन्यांची मालिका २-१ ने खिशात घातली आहे. या सामन्यात आणि मालिकेत केलेल्या अफलातून प्रदर्शनामुळे चहरलाच सामनावीर आणि मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
-
What an outing this has been for Deepak Chahar. Picks up 6 wickets against Bangladesh in the series decider 👏👏 pic.twitter.com/YUVLC8bq6K
— BCCI (@BCCI) November 10, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">What an outing this has been for Deepak Chahar. Picks up 6 wickets against Bangladesh in the series decider 👏👏 pic.twitter.com/YUVLC8bq6K
— BCCI (@BCCI) November 10, 2019What an outing this has been for Deepak Chahar. Picks up 6 wickets against Bangladesh in the series decider 👏👏 pic.twitter.com/YUVLC8bq6K
— BCCI (@BCCI) November 10, 2019
विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठास्थित मैदानावर झालेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताच्या १७४ धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ १४४ धावांवर आटोपला. बांगलादेशच्या फलंदाजीची सुरूवात चांगली झाली नाही. अवघ्या १२ धावांवर बांगलादेशने लिटन दास आणि सौम्या सरकार या फलंदाजांना गमावले. त्यानंतर आलेल्या मोहम्मद मिथुनला सोबत घेत सलामीवीर नईमने संघाचा डाव सावरला. नईमने ४८ चेंडूत १० चौकार आणि २ षटकारांसह ८१ धावांची तडाखेबंद खेळी केली. बांगलादेश सहज विजय मिळवणार असे वाटत असताना शिवम दुबे भारतासाठी धावून आला.
हेही वाचा - १५ वर्षाच्या शेफालीने सचिनच्या खास विक्रमाला टाकले मागे
दुबेने प्रथम नईमला नंतर मुश्फिकुर रहीमला माघारी धाडले. नईम बाद झाल्यावर बांगलादेशचा डाव कोलमडला. कर्णधार महमूदुल्लाह ८ धावांवर माघारी परतला. त्यानंतर आलेले फलंदाज बांगलादेशला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले. भारताकडून दीपक चहरने सर्वाधिक ६, शिवम दुबेने ३ तर चहलने १ बळी घेतला आहे.
तत्पूर्वी नाणेफेक जिंकून बांगलादेशने भाराताला फलंदाजीचे आमंत्रण दिले होते. भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद १७४ धावा केल्या. राहुलच्या ५२ आणि मुंबईकर श्रेयस अय्यरच्या झटपट ६२ धावांच्या जोरावर भारताला १७० चा आकडा गाठता आला. मागच्या सामन्यात हिरो ठरलेल्या रोहितला या निर्णायक सामन्यात मात्र चांगली कामगिरी करता आली नाही. शफीउल इस्लामने रोहितला २ धावांवर माघारी धाडले. धवनचा खेळ बहरत असताना शफीउल इस्लामनेच त्याला १९ धावांवर तंबूत धाडले. त्यानंतर, आलेल्या केएल राहुल आणि श्रेयस अय्यरने संघाचा डाव सावरला. राहुल झटपट धावा करत बांगलादेशच्या गोलंदाजांना दबावात टाकले. राहुल बाद झाल्यानंतर अय्यरही पॅव्हेलियनमध्ये परतला. ऋषभ पंतकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र, त्यालाही चांगली कामगिरी करता आली नाही. बांगलादेशकडून शफीउल इस्लाम आणि सौम्या सरकारने २ तर, अल अमीन हुसैनने १ बळी घेतला.