नवी दिल्ली - भारतीय महिला संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला संघात ५ सामन्यांची टी-२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. दरम्यान, या मालिकेतील दुसरा सामनाही पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. पण भारताने पहिला सामना जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतलेली आहे.
हेही वाचा - टी-२० मध्ये ऑस्ट्रेलियाच्या बेथ मूनीने रचला इतिहास, एका डावात ठोकले २० चौकार
दक्षिण आफ्रिकेचा महिला संघ भारत दौऱ्यावर आला आहे. दौऱ्यातील दोन सामन्यावर पावसाने पाणी फेरले आहे. पाच सामन्याच्या मालिकेत पाहिला सामना भारताने ११ धावांनी जिंकला असून त्यानंतर दुसरा आणि आज तिसरा (रविवार) सामना पावसामुळे होऊ शकला नाही.
मुसळधार पावसामुळे, नाणेफेक करता येणे शक्य झाले नाही. तेव्हा अखेर पंचानी रात्री आठ वाजता सामना रद्द करण्याची घोषणा केली. ही मालिका गुजरातमधील सुरतच्या मैदानात खेळवण्यात येत आहे.
हेही वाचा - महिला टी-20 : टीम इंडियाची आफ्रिकेवर ११ धावांनी मात