मुंबई - दक्षिण आफ्रिकेचा महिला क्रिकेट संघ, भारत दौऱ्यावर आहे. उभय संघात एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर भारतीय संघाने दुसरा सामना जिंकत शानदार कमबॅक केले आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. दुसरा सामना जिंकल्यानंतर भारतीय महिला खेळाडूंनी जल्लोष साजरा केला. यात त्यांनी ड्रेसिंग रुममध्ये भन्नाट डान्स केला. हा व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
भारतीय संघातील खेळाडू वेदा कृष्णमूर्तीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. यात वेदा, आकांक्षा कोहली, व्हीआर वनिता, ममता माबेन हे सर्वजण ड्रेसिंग रुममध्ये डान्स करताना पाहायला मिळत आहेत. तमिळ सुपरस्टार विजय याच्या मास्टर चित्रपटातील गाण्यावर त्यांनी डान्स केला.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
भारताने असा जिंकला सामना -
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने प्रथम गोलंदाजी करत आफ्रिकेला १५७ धावांवर रोखले. झूलन गोस्वामी (४) आणि राजेश्वरी गायकवाडने ३ विकेट घेत पाहुण्या संघाचे कंबरडे मोडले. त्यानंतर फलंदाजीत स्मृती मानधानाने ८० तर पूनम राऊतने ६२ धावा केल्या आणि भारताने हा सामना २८.४ षटकात ९ गडी राखत जिंकला. उभय संघातील तिसरा सामना १२ मार्चला खेळला जाणार आहे.
हेही वाचा - IND Vs ENG : टीम इंडिया पुन्हा रेट्रो जर्सीत दिसणार
हेही वाचा - ३६ वर्षांपूर्वी रवी शास्त्रींनी 'या' किताबासोबत जिंकली होती नवी कार!