ETV Bharat / sports

क्षेत्ररक्षणादरम्यान, गंभीर दुखापतीमुळे लुईस थेट रुग्णालयात दाखल - भारत विरुद्ध वेस्ट इंडीज लाईव्ह स्कोर

रोहित शर्माने ऊंचावरून मारलेला चेंडू अडवताना लुईसला दुखापत झाली. ही दुखापत एवढी गंभीर होती की, त्याला मैदानाबाहेर नेण्यासाठी थेट स्ट्रेचर आणावे लागले. त्यानंतर लुईसला उपचारांसाठी थेट हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.

india vs west indies : West Indie's Evin Lewis has gone to hospital for a scan on his right knee
क्षेत्ररक्षणादरम्यान, गंभीर दुखापतीमुळे लुईस थेट रुग्णालयात दाखल
author img

By

Published : Dec 11, 2019, 10:41 PM IST

मुंबई - भारताविरुध्द सुरू असलेल्या तिसऱ्या आणि निर्णायक टी-२० सामन्यात वेस्ट इंडीजला मोठा धक्का बसला. विंडीजचा सलामीवीर एव्हिन लुईसला क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली. यामुळे त्याला थेट रुग्णालयामध्ये नेण्यात आले आहे.

रोहित शर्माने ऊंचावरून मारलेला चेंडू अडवताना लुईसला दुखापत झाली. ही दुखापत एवढी गंभीर होती की, त्याला मैदानाबाहेर नेण्यासाठी थेट स्ट्रेचर आणावे लागले. त्यानंतर लुईसला उपचारांसाठी थेट हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्यामुळे वेस्ट इंडिजच्या डावाची सुरुवात लुईसला करता आली नाही. त्याच्या जागी ब्रेंडन किंगला सलामीला पाठवण्यात आले.

  • West Indie's Evin Lewis has gone to hospital for a scan on his right knee. He will not open the batting for his team in today's match. Brandon King to open with Lendl Simmons. #INDvsWESTIND

    — ANI (@ANI) December 11, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

नेमकं काय घडलं -

रोहितने डीप मिड-विकेटवर षटकार लावण्याचा प्रयत्न केला, परंतु सीमारेषेवर उभ्या असलेल्या एव्हिन लुईसने तो झेल एका हाताने पकडला पण आपला तोल जात असल्याचे लक्षात येताच त्याने चेंडू सीमारेषेच्या आत टाकला. चेंडू टाकून लुईस सीमारेषे बाहेर असलेल्या फ्लेक्सवर आदळला. यात त्याला गंभीर दुखापत झाली. दरम्यान, लुईसने रोहितने मारलेला षटकार अडवला.

हेही वाचा - IND vs WI : लुईसची शानदार फिल्डिंग, रोहित शर्माचा षटकार रोखला...पाहा व्हिडिओ

हेही वाचा - वानखेडेवर विंडीजची कामगिरी सरस, वाचा काय आहे इतिहास

हेही वाचा - भारत वि. विंडीजमध्ये वानखेडेवर आज निर्णायक टी-२० लढत.. मालिकाविजयासाठी दोन्ही संघ सज्ज

Intro:Body:

sports news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.