कटक - वेस्ट इंडीज विरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात भारतीय संघाने ४ गडी राखून विजय मिळवला आणि मालिका २-१ ने खिशात घातली. भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. विंडीजने पूरन आणि पोलार्डच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताला ३१६ धावाचे लक्ष्य दिले. तेव्हा भारतीय संघाने विराट कोहली, लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांच्या अर्धशतकांच्या जोरावर हा सामना जिंकला. पण या सामन्यात शार्दुल ठाकूर भारतीय संघासाठी तारणहार ठरला. त्याने मोक्याच्या क्षणी दणकेबाज खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.
भारतीय संघाचा या वर्षातील हा शेवटचा सामना होता. तो सामना जिंकत भारतीय संघाने वर्षाचा शेवट केला. दरम्यान, या सामन्यात विराट कोहली बाद झाल्यानंतर भारतीय संघ पराभूत होणार असे वाटत होते. तेव्हा शार्दुल ठाकूर आणि रवींद्र जडेजा या जोडीने भारताला विजय मिळवून दिला. शार्दुलने या सामन्यात ६ चेंडूत ४ चौकार आणि एक षटकारांच्या मदतीने नाबाद १७ धावा केल्या. याचं खेळीच्या जोरावर भारताने विजय मिळवला.
बीसीसीआयने या सामन्यातील महत्वाच्या क्षणाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आपल्या संघातील सहकाऱ्यांसोबत शार्दुल ठाकूर आणि रवींद्र जडेजाच्या खेळीवर आनंद व्यक्त करताना दिसत आहे. तर, जडेजा सामना जिंकल्यानंतर जल्लोष साजरा करताना पाहायला मिळत आहे. महत्वाचे म्हणजे, विंडीजचा कर्णधार केरॉन पोलार्ड सामना संपल्यानंतर जडेजाची गळाभेट घेताना दिसत आहे.
-
T20I series ✅
— BCCI (@BCCI) December 22, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
ODI series ✅
Early X-mas presents for the fans as India end 2019 on a high.#INDvWI #TeamIndia @paytm pic.twitter.com/0pevT671RF
">T20I series ✅
— BCCI (@BCCI) December 22, 2019
ODI series ✅
Early X-mas presents for the fans as India end 2019 on a high.#INDvWI #TeamIndia @paytm pic.twitter.com/0pevT671RFT20I series ✅
— BCCI (@BCCI) December 22, 2019
ODI series ✅
Early X-mas presents for the fans as India end 2019 on a high.#INDvWI #TeamIndia @paytm pic.twitter.com/0pevT671RF
हेही वाचा - शमीचे 'फॅन' बनले गावस्कर, म्हणाले, शमीच्या गोलंदाजीमुळे मार्शलची आठवण येते
हेही वाचा - नवीन वर्षातील 'या' दोन मालिकांसाठी भारतीय संघाची आज होणार घोषणा