ETV Bharat / sports

IND WS WI २nd T२०: लुईसच्या नियमानुसार भारत 22 धावांनी विजयी; मालिकाही खिशात - नाणेफेक

भारत विरुध्द वेस्ट इंडिज संघामध्ये रंगलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात पावसाच्या व्यत्ययानंतर भारताने 22 धावंनी विजय मिळवत मालिका खिशात घातली आहे.

LIVE IND WS WI २nd T२०: कृणाल पांड्याचा धडाका, एकाच षटकात विंडिजचे दोन गडी केले बाद
author img

By

Published : Aug 4, 2019, 7:53 PM IST

Updated : Aug 5, 2019, 1:40 AM IST

फ्लोरिडा - येथे भारत विरुध्द वेस्ट इंडिज संघामध्ये रंगलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात पावसाच्या व्यत्ययानंतर भारताने 22 धावंनी विजय मिळवत मालिका खिशात घातली आहे.

या सामन्यात भारताने विंडिजसमोर १६८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना विंडिजने 15.3 षटकांत 98 धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर पावसामुळे खेळ थांबविण्यात आले. शेवटी डकवर्थ लुईसच्या नियमानुसार भारताने 22 धावांनी बाजी मारली.

रोहित शर्माच्या ६७, कर्णधार कोहली २८, शिखर २३ आणि पांड्याच्या २० धावांच्या जोरावर भारताने निर्धारीत २० षटकात १६७ धावा जमवल्या होत्या. प्रत्युत्तरात विंडिजकडून १६८ धावांसाठी पाठलाग करताना पॉवलने अर्धशतक पूर्ण करत 54 धावा केल्या. पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबला, त्यावेळी कायरन पोलार्ड आणि शॉमरॉन हटमोयर खेळत होते.

तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधार कोहलीचा हा निर्णय सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवनने सार्थ ठरवला. दोघांनी ७.५ षटकांत ६७ धावांचा पाया रचला. त्यानंतर शिखर धवन व्यक्तीगत २३ धावांवर बाद झाला. एकीकडून रोहित शर्माने अर्धशतक झळकावले. कर्णधार कोहली आणि रोहितची जोडी जमलेली असताना रोहित शर्मा व्यक्तीगत ६७ धावांवर बाद झाला. मैदानात आलेला ऋषभ पंत पुन्हा अपयशी ठरला. तो अवघ्या ४ धावांची भर टाकत बाद झाला. त्यापाठोपाठ कोहलीही २८ धावांवर बाद झाला. तेव्हा मनीष पांडेही ६ धावांची भर टाकत तंबूत परतला. कृणाल पांड्या आणि रविंद्र जडेजाने अनुक्रमे २० आणि ९ धावा करत संघाला १६७ धावांपर्यंत पोहचवले.

LIVE UPDATE :

  • पावसामुळे डकवर्थ लुईसच्या नियमानुसार भारत 22 धावांनी विजयी

  • स्थानिक वेधशाळेच्या अंदाजानुसार, वीज पडण्याची शक्यता असल्याने, तसेच मैदानावर काळ्या ढगांनी गर्दी केल्याने खबरदारी म्हणून सामना थांबवण्यात आला आहे.

  • पावसाच्या शक्यतेमुळे खेळ थांबवला

  • विंडिज १४ षटकात ४ बाद ८९ धावा
  • कृणालने एकाच षटकात घेतले दोन बळी
  • रोव्हमॅन पॉव्हेल ५४ धावांवर बाद, कृणाल पांड्याने केले पायचित
  • निकोलस पुरन माघारी, कृणाल पांड्याने घेतला बळी
  • निकोलस पुरन आणि रोव्हमॅन पॉव्हेलची जोडी मैदानात
  • विंडिज १३ षटकात २ बाद ८३ धावा
  • रोव्हमॅन पॉव्हेलचे अर्धशतक पूर्ण
  • विडिंज ११ षटकात २ बाद ६६ धावा
  • विंडिजला दुसरा धक्का... सुनील नरीन माघारी
  • विंडिजला पहिला धक्का,सुंदरच्या गोलंदाजीवर एव्हीन लुईस बाद
  • सलामीवीर मैदानात
  • वेस्ट इंडिजच्या डावाला सुरुवात
  • वेस्ट इंडिजला विजयासाठी १६८ धावांचे लक्ष्य
  • भारत २० षटकात ५ बाद १६७ धावा
  • कुणाल पांड्या आणि रविंद्र जडेजाची जोडी मैदानात
  • मनीष पांडे ६ धावांवर बाद, शेल्डन कोट्रेलच्या गोलंदाजीवर पूरनने घेतला झेल
  • भारत १८ षटकात ४ बाद १४१ धावा
  • कर्णधार कोहली माघारी, २८ धावांवर शेल्डन कोट्रेलने केले त्रिफाळाचित
  • भारत १६ षटकात ३ गडी बाद १३० धावा
  • भारताला तिसरा धक्का, पंत माघारी, ओशाने थॉमसच्या गोलंदाजीवर पोलार्डने घेतला झेल
  • भारत १५ षटकात २ गडी बाद १२६ धावा
  • ऋषभ पंत आणि विराट कोहलीची जोडी मैदानात
  • रोहित शर्मा ६७ धावांवर बाद, ओशाने थॉमसच्या गोलंदाजीवर हेटमायरने घेतला झेल
  • भारत शतकीपार, १३ षटकात १ बाद १११ धावा
  • भारत ११ षटकात १ बाद ८७ धावा
  • रोहित शर्माचे अर्धशतक पूर्ण
  • कर्णधार विराट कोहली मैदानात
  • भारताला पहिला धक्का, शिखर धवन २३ धावांवर किमो पॉलच्या गोलंदाजीवर त्रिफाळाचित
  • भारत पन्नाशी पार, ६ षटकात बिनबाद ५२ धावा
  • भारत ५ षटकात बिनबाद ३९ धावा रोहित २३ धावांवर तर धवन १२ धावा
  • भारताची सावध सुरुवात, ३ षटकात बिनबाद २१ धावा
  • भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन मैदानात
  • भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय

Intro:Body:

sports

Conclusion:
Last Updated : Aug 5, 2019, 1:40 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.