मुंबई - भारताविरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक टी-२० सामन्याआधी वेस्ट इंडीज संघाला मोठा धक्का बसला आहे. विंडीजचा अष्टपैलू खेळाडू फॅबियन एलेनची दुखापत पूर्णपणे बरी झाली नाही. यामुळे तो वानखेडे मैदानावरील निर्णायक सामना खेळू शकणार नाही.
वेस्ट इंडीज संघाचे प्रशिक्षक फिल सिमन्स यांनी सांगितलं की, 'फॅबियनच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. या दुखापतीतून तो अद्याप पूर्णपणे बरा झालेला नाही. यामुळे बुधवारी होणाऱ्या सामन्यात तो खेळू शकणार नाही.'
दरम्यान, फॅबियन एलेनला अफगाणिस्तान विरुद्धच्या लखनऊ येथील सामन्यात दुखापत झाली होती. यामुळे तो भारताविरुद्धचे दोनही सामने खेळू शकलेला नव्हता.
भारत आणि वेस्ट इंडीज संघात तीन सामन्याची टी-२० मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने ६ गडी राखून जिंकला. तर दुसरा सामना वेस्ट इंडीज संघाने ८ गडी राखून जिंकला आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. अखेरचा सामना मुंबईत होणार आहे.
भारताचा संभाव्य संघ -
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, दीपक चहर आणि भुवनेश्वर कुमार.
वेस्ट इंडीजचा संभाव्य संघ -
केरॉन पोलार्ड (कर्णधार), शेल्डन कॉट्रेल, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, कीमो पॉल, ब्रँडन किंग, एविन लुईस, खॅरी पियरे, निकोलस पूरन, दिनेश रामदीन, शेरफेन रदरफोर्ड, लेंडल सिमन्स, केसरिक विलियम्स आणि हेडन वॉल्स ज्युनिअर.
हेही वाचा - विराटला आवडायची 'ही' अभिनेत्री, स्वत: दिली कबुली
हेही वाचा - 'ऑस्ट्रेलियातील विश्व करंडकाला बराच अवधी, सध्या मालिका जिंकायचयं'