ETV Bharat / sports

IND VS WI : सराव सामना 'ड्रॉ', भारतीय संघाने फलंदाजीसह गोलंदाजीत केले हात साफ

मागील काही दिवसांपासून फॉर्मात नसलेला, भारताचा भरवशाचा फलंदाज अजिंक्य रहाणेने सराव सामन्याच्या शेवटच्या दिवशी अर्धशतकी खेळी करत आपण फॉर्मात आलो असल्याचे संकेत दिले आहे. तसेच या सराव सामन्यात पहिल्या डावामध्ये चेतेश्वर पुजारा याने शतक (१००) तर रोहित शर्माने (६८) धावा ठोकत भारतीय फलंदाजी बहरली असल्याचे संकेत दिले आहेत.

IND VS WI : सराव सामना 'ड्रॉ', भारतीय संघाने फलंदाजीसह गोलंदाजीत केले हात साफ
author img

By

Published : Aug 20, 2019, 10:44 AM IST

जमैका - वेस्ट इंडिजविरुध्दच्या २ कसोटी सामन्यांच्या मालिकेत विजय मिळवून आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची धमाकेदार सुरुवात करण्याचा दृष्टीने भारतीय संघाचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, या सामन्यांपूर्वी भारताच्या खेळाडूंनी तीन दिवसीय सराव सामन्यात वेस्ट इंडिज अ संघाविरुद्ध फलंदाजी आणि गोलंदाजीत हात साफ केले. हा सामना अनिर्णित राहिला असला तरी, खेळाडूंने मनोबल वाढले आहे.

मागील काही दिवसांपासून फॉर्मात नसलेला, भारताचा भरवशाचा फलंदाज अजिंक्य रहाणेने सराव सामन्याच्या शेवटच्या दिवशी अर्धशतकी खेळी करत आपण फार्मात आले असल्याचे संकेत दिले आहे. तसेच या सामन्यातील पहिल्या डावामध्ये चेतेश्वर पुजारा याने शतक (१००) तर रोहित शर्माने (६८) धावा ठोकत भारतीय फलंदाजी बहरली असल्याचे संकेत दिले आहेत.

विराट कोहलीच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या भारतीय संघाने पहिल्या डावात पुजारा आणि रोहितच्या खेळीने ५ बाद २९७ धावांवर डाव घोषित केला. त्यानंतर इशांत शर्मा, उमेश यादव आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी ३ गडी बाद करत वेस्ट इंडिज अ संघाचा डाव 181 धावांत गुंडाळला.

भारताकडून दुसऱ्या डावात हनुमा विहारी आणि रहाणे यांनी अर्धशतकी केली. भारताने दुसरा डाव ५ बाद १८८ धावांवर घोषित करुन वेस्ट इंडिज अ संघासमोर विजयासाठी ३०५ धावांचे लक्ष्य ठेवले. विंडीजने प्रत्युत्तरात ३ बाद ४७ धावा केल्या आणि सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवले.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.