अँटिगुआ - विश्वकरंडक स्पर्धेतील उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात मतभेद सुरू असल्याची चर्चा रंगली होती. तेव्हा वेस्ट इंडिजला जाण्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत विराटने मतभेदाच्या चर्चांना फेटाळून लावले होते. यानंतरही दोघात सगळं काही सुरुळीत नसल्याचं दिसत होते. मात्र, विराटने आता सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. त्यात रोहित जरी दिसत असला तरी तो एका बाजूला उभा आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यात मतभेद असल्याच्या विषयावरुन दोघांनी कोणती प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, रोहित शर्माने पती पत्नी विराट-अनुष्का यांना सोशल मीडियावर अनफॉलो केले. यामुळे यांच्यात अद्याप वाद असल्याचे बोलले जात होते. मात्र आता विराटने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
विंडीजविरुद्धच्या अँटिगुआतील सामन्यापूर्वी जॉली बीचवर पार्टीतील फोटो विराटने शेअर केला आहे. यामध्ये विराट आणि रोहित दोघेही दिसत आहेत. मात्र, यानंतरही दोघांमध्ये मतभेद असल्याचे म्हटले जात आहे. दोघे एका फोटोत असले तरी विराट सर्वांच्या मधोमध असून रोहित शर्मा एका बाजूला आहे. दरम्यान विराटने शेअर केलेल्या फोटोमध्ये भारतीय संघाचे खेळाडू दिसत आहेत. यामध्ये केएल राहुल, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत, मयंक अगरवाल आणि अजिंक्य रहाणे उपस्थित आहेत.
दरम्यान, यापूर्वी विराटने शेअर केलेल्या फोटोत रोहित नव्हता तेव्हा चाहत्यांनी काही बिनसले आहे का? असा प्रश्न विचारला होता. त्यानंतर विराटने रोहित फोटोमध्ये असलेला फोटो शेअर केला आहे.