अँटिग्वा - भारत विरुध्द वेस्ट इंडिजच्या पहिल्या कसोटी सामन्यात विंडीजचा कर्णधार जेसन होल्डरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णय घेतला. सामन्यावर पावसाचे सावट निर्माण झाले होते. यामुळे नाणेफेकीसाठी उशीर झाला होता. दरम्यान, हा सामना भारतासाठी आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची सुरुवात आहे. यामुळे भारतीय संघ विजयी शुभारंभ करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
यजमान वेस्ट इंडीज संघाकडून शामार ब्रूक्स पदार्पण करत आहे. तर भारतीय संघात लोकेश राहुल आणि मयंक अगरवाल यांना संधी देण्यात आली आहे. लोकेश राहुल आणि मयंक अगरवाल हे सलामीला उतरतील. वृध्दीमान साहा, रवीचंद्रन अश्विन, रोहित शर्मा, कुलदीप यादव आणि उमेश यादव यांना अंतिम ११ मध्ये स्थान मिळाले नाही. दरम्यान, वेस्ट इंडीजचा संघ या सामन्यात चार वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरला आहे.
भारतीय संघ -
मयंक अगरवाल, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह.
वेस्ट इंडीजचा संघ -
जेसन होल्डर (कर्णधार), क्रेग ब्रेथवेट, जॉन कॅम्पबेल, शाय होप (यष्टीरक्षक), शामार ब्रूक्स, डॅरेन ब्राव्हो, शिम्रॉन हेटमायर, रोस्टन चेस, मिग्युअल कमिन्स, शेनॉन गॅब्रिएल आणि केमार रोच.