नवी दिल्ली - भारत आणि आफ्रिका यां संघातील टी-२० मालिका नुकतीच संपली आहे. उभय संघांतील ही तीन सामन्यांची मालिका १-१ बरोबरीत सुटली. आता भारत आफ्रिकेविरुद्ध २ ऑक्टोबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात करणार आहे.
-
That's a wrap from the T20I series. See you soon in the Tests ✌️🇮🇳 #TeamIndia #INDvSA pic.twitter.com/oqhhrH0g4D
— BCCI (@BCCI) September 22, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">That's a wrap from the T20I series. See you soon in the Tests ✌️🇮🇳 #TeamIndia #INDvSA pic.twitter.com/oqhhrH0g4D
— BCCI (@BCCI) September 22, 2019That's a wrap from the T20I series. See you soon in the Tests ✌️🇮🇳 #TeamIndia #INDvSA pic.twitter.com/oqhhrH0g4D
— BCCI (@BCCI) September 22, 2019
हेही वाचा - विराटला मिळाली ताकीद, तिसऱ्या टी -२० सामन्यात केला होता 'हा' प्रकार
या दोन्ही संघांत तीन टी-२० मालिकेप्रमाणे तीन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चँम्पियनशिपमध्ये आफ्रिका पहिल्यांदाच मालिका खेळणार आहे. तर, भारतीय संघाने टेस्ट चँम्पियनशिप स्पर्धेमध्ये आघाडी घेतली आहे.
दोन्ही संघातील कसोटी मालिकेचे वेळापत्रक -
- पहिला सामना - २ ते ६ ऑक्टोबर - विशाखापट्टणम.
- दुसरा सामना - १० ते १४ ऑक्टोबर - पुणे.
- तिसरा सामना - १९ ते २३ ऑक्टोबर - रांची.
भारतीय संघ -
विराट कोहली, मयांक अग्रवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिषभ पंत, वृद्धीमान सहा, आर अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, शुभमन गिल.
दक्षिण आफ्रिकेचा संघ -
फाफ डू प्लेसिस ( कर्णधार), टेंबा बवुमा, थेयूनिस डी ब्रुयन, क्विंटन डी कॉक, डीन एल्गार, झुबायर हम्झा, केशव महाराज, एडन मार्क्राम, सेनुरन मुथूसामी, लुंगी एनगिडी, अॅनरीच नोर्टजे, व्हेर्नोन फिलेंडर, डॅन पिएड्त, कागिसो रबाडा, रुडी सेकंड.