चेन्नई - इंग्लंडने पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी ४२० धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने चौथ्या दिवसाअखेर १ बाद ३९ धावा केल्या आहेत. सलामीवीर रोहित शर्मा पहिल्या डावापाठापोठ दुसऱ्या डावात देखील अपयशी ठरला. जॅक लिचच्या गोलंदाजीवर तो १२ धावांवर त्रिफाळाचित झाला.
-
STUMPS 🏏
— ICC (@ICC) February 8, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
India finish day four on 39/1
They need 381 more to win. England need nine wickets.#INDvENG ➡️ https://t.co/gnj5x4GOos pic.twitter.com/2lon38JptO
">STUMPS 🏏
— ICC (@ICC) February 8, 2021
India finish day four on 39/1
They need 381 more to win. England need nine wickets.#INDvENG ➡️ https://t.co/gnj5x4GOos pic.twitter.com/2lon38JptOSTUMPS 🏏
— ICC (@ICC) February 8, 2021
India finish day four on 39/1
They need 381 more to win. England need nine wickets.#INDvENG ➡️ https://t.co/gnj5x4GOos pic.twitter.com/2lon38JptO
अखेरच्या दिवशी भारतीय संघाला ९० षटकांत ३८१ धावा करायच्या आहेत. तर इंग्लंड संघाला विजयासाठी ९ गडी बाद करावे लागतील. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा शुबमन गिल १५ आणि अनुभवी चेतेश्वर पुजारा १२ धावांवर नाबाद होते. दरम्यान, २००८ साली भारतीय संघाने चेन्नईमध्ये इंग्लंड विरोधातच चौथ्या डावात ३८७ धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला होता. यात सचिन तेंडुलकरने शानदार शतक झळकावले होते. त्यामुळे या सामन्यात भारतीय फलंदाज कशी फलंदाजी करणार यांची उत्सुकता आहे.
चौथ्या दिवशी पाहुण्या संघाने पहिल्या डावात २४१ धावांची आघाडी असतानाही फॉलोऑन न देण्याचा निर्णय घेतला आणि दुसऱ्या डावात फलंदाजी केली. भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या डावात अचूक टप्यावर मारा करत इंग्लंडला १७८ धावांवर रोखले आणि भारताला विजयासाठी ४२० धावांचे लक्ष्य मिळाले. दुसऱ्या डावात फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने सर्वाधिक ६ गडी बाद केले.
चौथ्या दिवशी भारतीय संघाला ३३७ धावांवर रोखल्यानंतर इंग्लंड संघाला पहिल्या डावात २४१ धावांची आघाडी मिळाली. इंग्लंडने पहिल्या डावांत ५७८ धावांचा डोंगर उभारला होता. दुसऱ्या डावात इंग्लंडची सुरूवात खराब झाली. डावाच्या पहिल्याच चेंडूवर सलामीवीर रोरी बर्न्स अश्विनच्या गोलंदाजीवर शून्यावर बाद झाला. त्यानंतर डॉम सिबली (१६), डॅन लॉरेन्स (१८), बेन स्टोक्स (७) आणि जो रूट (४०) एकापाठोपाठ एक जण फटकेबाजी करण्याच्या नादात बाद झाले. अखेरीस इंग्लंडला कशीबशी १७८ धावांपर्यंत मजल मारता आली.
तआधी, जो रूटच्या द्विशतकाच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या डावात ५७८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने ३३७ धावा केल्या. आघाडीचे फलंदाज अपयशी ठरल्यानंतर चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत आणि वॉशिग्टन यांनी भारताचा डाव सावरला. पुजाराने ७३ तर पंतने ९१ धावा केल्या. हे दोघे बाद झाल्यानंतर वॉशिंग्टन सुंदरनेही एकाकी झुंज देत नाबाद ८५ धावा केल्या.
हेही वाचा - Ind vs Eng : भारतीय संघाला विजयासाठी ४२० धावांचे आव्हान; अश्विनचा विकेट्सचा षटकार
हेही वाचा - कसोटी डावातील पहिल्या चेंडूवर विकेट घेणारा अश्विन ठरला पहिला भारतीय फिरकीपटू