पुणे - भारत-इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेला आजपासून सुरूवात झाली आहे. उभय संघात तीन सामने होणार असून हे सर्व सामने पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहेत. पहिल्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतीय संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे. दरम्यान या पहिल्या सामन्यातून भारतीय संघाकडून २ खेळाडूंनी पदार्पण केले. संघ व्यवस्थापनाने अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या आणि प्रसिद्ध कृष्णाला अंतिम संघात स्थान दिलं आहे.
हार्दिक पांड्याने आपला मोठा भाऊ कृणालला, भारतीय संघाची कॅप देऊन संघात स्वागत केले. तसेच प्रसिद्ध कृष्णालाही कॅप देण्यात आली. कृणाल एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताकडून पदार्पण करणारा २३३ वा, तर प्रसिद्ध २३४ वा भारतीय ठरला आहे.
हार्दिकने कृणालला भारतीय संघाची कॅप दिली. यावेळेस कृणाल भावूक झाला. त्याने आकाशाकडे पाहत आपल्या वडिलांना अभिवादन केले. यावेळी कृणालने हार्दिकला मिठी देखील मारली. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पांड्या ब्रदर्सच्या वडिलांचे निधन झाले आहे. यामुळे आजच्या सामन्याच्या सुरूवातीला पांड्या ब्रदर्स त्यांच्या वडिलांच्या आठवणीमुळे भावूक झाले होते. या क्षणाचा व्हिडिओ बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे.
-
ODI debut for @krunalpandya24 👌
— BCCI (@BCCI) March 23, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
International debut for @prasidh43 👍#TeamIndia @Paytm #INDvENG pic.twitter.com/Hm9abtwW0g
">ODI debut for @krunalpandya24 👌
— BCCI (@BCCI) March 23, 2021
International debut for @prasidh43 👍#TeamIndia @Paytm #INDvENG pic.twitter.com/Hm9abtwW0gODI debut for @krunalpandya24 👌
— BCCI (@BCCI) March 23, 2021
International debut for @prasidh43 👍#TeamIndia @Paytm #INDvENG pic.twitter.com/Hm9abtwW0g
भारतीय संघ -
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, शार्दुल ठाकूर, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा.
इंग्लंडचा संघ -
इयॉन मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स, जॉस बटलर, सॅम बिलिंग्स, मोईन अली, सॅम करन, टॉम करन, आदिल रशीद आणि मार्क वूड.
हेही वाचा - इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक धावा करणारे भारताचे टॉप-३ फलंदाज, पहिला तर आहे खास
हेही वाचा - Ind vs Eng ODI Series : भारत-इंग्लंड १०० वेळा आमनेसामने, कोण ठरलं वरचढ