ETV Bharat / sports

Cricket World Cup: राहुल-धोनीच्या धमाकेदार शतकी खेळीच्या जोरावर भारताने उडवला बांगलादेशचा धुव्वा

लोकेश राहुल आणि महेंद्रसिंग धोनीच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने केल्या ३५९ धावा

author img

By

Published : May 29, 2019, 2:19 PM IST

राहुल-धोनीच्या धमाकेदार शतकी खेळीच्या जोरावर भारताने उडवला बांगलादेशचा धुव्वा

कार्डिफ - आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या गेलेल्या सराव सामन्यात भारतीय संघाने ९५ धावांनी मोठा विजय मिळवला. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याच्या निर्णय घेतला होता. सोफिया गार्डन्स क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात लोकेश राहुल आणि महेंद्रसिंग धोनीच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने निर्धारीत ५० षटकांमध्ये ७ विकेट गमावत ३५९ धावा केल्या.

लोकेश राहुल आणि महेंद्रसिंग धोनीची धमाकेदार खेळी

बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या या सराव सामन्यात भारतासाठी लोकेश राहुलने १२ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने १०८ धावांची दमदार खेळी केली. त्यानंतर मैदानात उतरलेल्या महेंद्रसिंग धोनीने ७८ चेंडूत ८ चौकार व ७ षटकारांच्या जोरावार ११३ धावांची वादळी खेळी साकारत भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारुन दिली

भारताने उडवला बांगलादेशचा धुव्वा
भारताने उडवला बांगलादेशचा धुव्वा

या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ ४९.३ षटकांमध्ये २६४ धावांवर सर्वबाद झाला. बांगलादेशसाठी मुशफिकुर रहीमने सर्वाधिक ९० धावा केल्या. तर सलामिवीर लिटॉन दासने ७३ धावा केल्या. हे दोन्ही फलंदाज वगळता ईतर कोणत्याही फलंदाजाला भारतीय गोलंदाजीच्या आक्रमाणाचा सामना करता आला नाही. भारताकडून कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी ३ तर सप्रीत बुमराहने २ विकेट गारद केलेत.

Intro:Body:

sports

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.