लंडन - आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारत आज आपल्या दुसऱ्या सराव सामन्यात बांगलादेशशी लढणार आहे. यापूर्वी झालेल्या पहिल्या सराव सामन्यात न्यूझीलंड संघाने भारताचा धुव्वा उडवत ६ गडी राखून विजय मिळवला होता. आजच्या दिवसातील दुसरा सराव सामना हा न्यूझीलंड आणि विंडीज संघामध्ये खेळण्यात येणार आहे.
बांगलादेश-भारत हा सराव सामना कार्डिफ येथिल सोफिया गार्डन्स आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर खेळण्यात येणार असून भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता हा सराव सामना खेळला जाईल. विश्वचषकापूर्वी भारतीय क्रिकेट संघाकडे तयारी करण्यासाठी ही शेवटची संधी असणार आहे.
विश्वचषक स्पर्धेची सुरुवात ३० मेला दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्या सामन्यापासून होणार आहे. तर स्पर्धेचा अंतिम सामना १४ जुलैला लॉर्डसवर खेळण्यात येणार आहे.
भारताचा संघ
- विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, विजय शंकर, रवींद्र जडेजा.
बांगलादेशचा संघ
- मश्रफे मोर्तझा (कर्णधार), तमीम इक्बाल, लिटॉन दास, सौम्य सरकार, मुशफिकुर रहीम, महमुदुल्ला, शाकिब अल हसन, मोहम्मद मिथुन, सब्बीर रेहमान, मोसद्देक हुसेन, मोहम्मद सैफुद्दीन, मेहदी हसन मिराज, रुबेल हुसेन, मुस्ताफिजूर रेहमान, अबू जायेद.