मेलबर्न - तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने भारताचा ११ धावांनी पराभव करत जेतेपद पटकावले. मराठमोळ्या स्मृती मानधानाने या सामन्यात अर्धशतकी खेळी केली. स्मृती बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने सामन्यात पुनरागमन करत विजेतेपदाला गवसणी घातली.
नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियाची सुरुवात निराशाजनक झाली. अलिसा हिली अवघ्या ४ धावांवर माघारी परतली. तिला दीप्ती शर्माने पहिल्या षटकात बाद केले. त्यानंतर मूनी आणि अॅशलेघ गार्डनर यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. अरुंधती रेड्डीने गार्डनरला (२६) बाद करत ही जोडी फोडली.
कर्णधार मेन लॅगिंगने तिसऱ्या विकेटसाठी मूनीसह अर्धशतकी भागीदारी केली. लॅनिंगला (२६ ) राधा यादवने बाद केले. यानंतर ऑस्ट्रेलियाला एलिसा पेरी आणि अॅनाबेलच्या रुपाने दोन धक्के बसले.
-
🏆 WINNERS 🏆#CmonAussie pic.twitter.com/xr141bjRFC
— Australian Women's Cricket Team 🏏 (@AusWomenCricket) February 12, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">🏆 WINNERS 🏆#CmonAussie pic.twitter.com/xr141bjRFC
— Australian Women's Cricket Team 🏏 (@AusWomenCricket) February 12, 2020🏆 WINNERS 🏆#CmonAussie pic.twitter.com/xr141bjRFC
— Australian Women's Cricket Team 🏏 (@AusWomenCricket) February 12, 2020
अखेरीस मूनी एका बाजू पकडून ऑस्ट्रेलियाला १५५ धावांची मजल मारुन दिली. मूनीने ५४ चेंडूत ९ चौकारांसह नाबाद ७१ धावांची खेळी केली. तिला हायसेनने १८ धावा करत चांगली साथ दिली. भारतकडून दीप्ती शर्मा, राजेश्वरी गायकवाड यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर अरुंधती रेड्डी, राधा यादव यांनी प्रत्येकी १-१- गडी बाद केला.
ऑस्ट्रेलियाच्या १५६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरूवात खराब झाली. शेफाली वर्मा १० धावांवर बाद झाली. त्यानंतर आजच्या सामन्यात जेमिमा रॉड्रीग्जच्या जागेवर बढती मिळालेल्या रिचा घोषने स्मृती मानधनासह ४३ धावांची भागिदारी केली. अॅनाबेल सदरलँडने रिचाला (१७) बाद करत ही भागीदारी संपुष्टात आणली. जेमिमाही दोन धावांवर माघारी परतली.
भारताचे ९.५ षटकात ३ बाद ६५ अशी अवस्था झाली होती. तेव्हा स्मृतीने एक बाजू पकडून अर्धशतक झळकावले. तिची खेळी निकोला कॅरीने संपुष्टात आणली. स्मृतीने ३७ चेंडूत ११ चौकारांसह ६६ धावांची खेळी केली. त्यानंतर भारतीय डावाला गळती लागली.
भारताला अखेरच्या षटकात विजयासाठी १५ धावांची आवश्यकता होती, तेव्हा ऑस्ट्रेलियाची जेस जोनासेन हिने टिच्चून मारा केला. भारताचा संपूर्ण संघ १४४ धावांत माघारी परतला.
सामन्यात सर्वाधिक ५ बळी घेणारी जेस जोनासेन सामनावीर ठरली. तर बेथ मूनीने मालिकावीरचा पुरस्कार पटकावला. दरम्यान भारताने इंग्लंडचा पत्ता कट करून तिरंगी मालिकेची अंतिम फेरीत गाठली होती.