सिडनी - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आजपासून (ता. ७) तिसऱ्या कसोटी सामन्याला सिडनीमध्ये सुरूवात झाली आहे. हा सामना ऐतिहासिक ठरला आहे. कारण या सामन्यात एक महिला अंपायरिंग करत आहे. ऑस्ट्रेलियाची क्लेअर पोलोसका असे महिला अंपायरचे नाव आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया सामन्यात क्लेअर पोलोसका या महिला चौथ्या अंपायरच्या भूमिकेत आहेत. याआधी त्यांनी पुरूष एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अंपायरिंग केली आहे.
उभय संघात चार सामन्याची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात पॉल रिफेल आणि पॉल विल्सन हे मैदानातील अंपायर म्हणून काम पाहात आहेत. ब्रूस ऑक्सनफोर्ड हे तिसरे अंपायर आहेत. तर डेव्हिड बून मॅच रेफरी आहेत. त्यानंतर चौथे अंपायर म्हणून क्लेअर पोलोसाक या जबाबदारी सांभाळत आहेत.
क्लेअर पोलोसाक यांनी २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियातील पुरूष क्रिकेटमधील काही सामन्यात अंपायर म्हणून काम केले आहे. आयसीसीच्या कसोटी सामन्याच्या नियमानुसार चौथ्या अंपायरची निवड देशांतर्गत क्रिकेट मंडळातर्फे आंतरराष्ट्रीय पॅनलकडून करण्यात येते.
हेही वाचा - EXCLUSIVE: भारतीय संघाने मेलबर्नमधील कित्ता सिडनीमध्ये गिरवावा : प्रवीण आमरे
हेही वाचा - Ind vs Aus : पंतचे करायचे काय?, पुकोव्हस्कीला दिलं २ जीवदान