ETV Bharat / sports

IND Vs AUS : विराट भारतात मन मात्र ऑस्ट्रेलियात; पहिल्या दिवसाच्या खेळावर दिली 'ही' प्रतिक्रिया

author img

By

Published : Dec 26, 2020, 5:00 PM IST

टीम इंडियाच्या पहिल्या दिवशीच्या खेळाबद्दल विराटने ट्विट केलं आहे. यात त्याने, दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिला दिवस आपल्यासाठी शानदार राहिला आहे. गोलंदाजांनी दमदार प्रदर्शन केले आहे. आजच्या दिवसाचा शेवटी जबरदस्त होता, असे म्हटलं आहे.

India vs Australia: Back in India, Virat Kohli reacts to India’s performance on Day 1 of MCG Test
IND Vs AUS : विराट भारतात मन मात्र ऑस्ट्रेलियात; पहिल्या दिवसाच्या खेळावर दिली 'ही' प्रतिक्रिया

मुंबई - विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आश्वासक सुरुवात केली आहे. उभय संघातील सामन्याच्या पहिल्या दिवशीच्या खेळीवर कर्णधार विराट कोहलीने ट्विट केले आहे. यातून त्याने टीम इंडियाचे मनोबल वाढवण्याचे प्रयत्न केला आहे.

पहिल्या कसोटी सामन्यानंतर विराट कोहली मायदेशी परतला आहे. विराटच्या अनुपस्थितीत टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉक्सिंग डे कसोटी सामना खेळत आहे. या सामन्यात टीम इंडियाने पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला १९५ धावांत गुंडाळले. त्यानंतर १ बाद ३६ धावांपर्यंत मजल मारली आहे.

टीम इंडियाच्या पहिल्या दिवशीच्या खेळाबद्दल विराटने ट्विट केलं आहे. यात त्याने, दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिला दिवस आपल्यासाठी शानदार राहिला आहे. गोलंदाजांनी दमदार प्रदर्शन केले आहे. आजच्या दिवसाचा शेवटी जबरदस्त होता, असे म्हटलं आहे.

  • Top day 1 for us. Great display from the bowlers and a solid finish too. 🇮🇳👏

    — Virat Kohli (@imVkohli) December 26, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दरम्यान, विराटची पत्नी बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही लवकरच बाळाला जन्म देणार आहे. यामुळे विराट भारतात परतला आहे. जरी तो मायदेशी परतला असला तरी, तो टीम इंडियाचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे.

भारतीय गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाचे लोटांगण

बॉक्सिंग डे सामन्यात ऑस्ट्रेलिया नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. तेव्हा जसप्रीत बुमराह आणि रविचंद्रन आश्विन यांनी ऑस्ट्रेलियाच्या डावाला खिंडार पाडले. त्यांना मोहम्मद सिराज आणि रविंद्र जडेजाची साथ लाभली. मार्नस लाबुशेन आणि ट्रॅविस हेड यांचा अपवाद वगळता ऑस्ट्रेलियाचा एकही फलंदाज भारतीय गोलंदाजीचा सामना करु शकला नाही. बुमराहने ४, आश्विनने ३ तर पदार्पणाचा कसोटी सामना खेळणाऱ्या मोहम्मद सिराजने २ बळी घेतले. तर जडेजाने एक गडी बाद केला. लाबूशेन (४८) आणि हेड (३८) यांच्यामुळे ऑस्ट्रेलियाला १९५ धावा करता आल्या.

हेही वाचा - बॉक्सिंग डे कसोटी : ऑस्ट्रेलिया १९५ धावांवर नेस्तनाबूत, भारताची खराब सुरुवात

हेही वाचा - माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांना बॉक्सिंग डे कसोटीत वाहण्यात आली श्रद्धांजली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.