हैदराबाद - भारतीय संघ २०२० या वर्षातील पहिल्या परदेश दौऱ्यासाठी न्यूझीलंडमध्ये दाखल झाला आहे. या दौऱ्याला २४ जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. भारतीय संघ या दौऱ्यात ५ टी-२०, ३ एकदिवसीय आणि २ कसोटी सामने खेळणार आहे. टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा याआधीच करण्यात आली आहे. त्यानंतर मंगळवारी रात्री ( ता. २१) एकदिवसीय संघाची निवड करण्यात आली. तर अद्याप कसोटी संघाची घोषणा करण्यात आलेली नाही. ६ आठवड्यासाठी न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाचे असे आहे वेळापत्रक...
भारतीय संघाच्या न्यूझीलंड दौऱ्याचे वेळापत्रक -
टी-२० मालिका -
- पहिली टी-२० : ऑकलंड - २४ जानेवारी २०२०
- दुसरी टी-२० : ऑकलंड - २६ जानेवारी २०२०
- तिसरी टी-२० : हॅमिल्टन - २९ जानेवारी २०२०
- चौथी टी-२० : वेलिंग्टन - ३१ जानेवारी २०२०
- पाचवी टी-२० : माऊंट माउंगानुई - ०२ फेब्रुवारी २०२०
असा आहे भारतीय टी-२० संघ -
विराट कोहली (कर्णधार),रोहित शर्मा (उप कर्णधार ), संजू सॅमसन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दूबे, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकुर.
एकदिवसीय मालिका -
- पहिला एकदिवसीय सामना : हॅमिल्टन - ०५ फेब्रुवारी २०२०
- दुसरा एकदिवसीय सामना : ऑकलंड - ०८ फेब्रुवारी २०२०
- तिसरा एकदिवसीय सामना : माऊंट माउंगानुई - ११ फेब्रुवारी २०२०
असा आहे भारतीय एकदिवसीय संघ -
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दूबे, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकुर आणि केदार जाधव.
- न्यूझीलंड अ संघाविरुद्ध ३ दिवसाचा सराव सामना : हॅमिल्टन- १४ ते १६ फेब्रुवारी
कसोटी मालिका
- पहिली कसोटी : २१ ते २५ फेब्रुवारी - वेलिंग्टन
- दुसरी कसोटी : २९ फेब्रुवारी ते ०४ मार्च - ख्राइस्टचर्च