ETV Bharat / sports

भाऊ...पारंपरिक कसोटी आणि दिवस-रात्र कसोटी यात काय फरक आहे

author img

By

Published : Nov 19, 2019, 7:33 PM IST

Updated : Nov 19, 2019, 8:10 PM IST

पारंपरिक कसोटी सामने हे लाल चेंडूवर खेळले जातात. मात्र, दिवस-रात्र कसोटी सामन्यांमध्ये गुलाबी रंगाचा चेंडू वापरला जातो. हा बदल रात्री फलंदाजांना प्रकाशझोतात चेंडू पटकन दिसावा म्हणून करण्यात आला आहे. आतापर्यंत खेळवण्यात आलेल्या सर्व दिवस-रात्र कसोटी सामन्यासाठी कुकाबुरा या कंपनीचेच गुलाबी चेंडू वापरले गेले आहेत.

भाऊ...पारंपरिक कसोटी आणि दिवस-रात्र कसोटी यात काय फरक आहे

नवी दिल्ली - भारत आणि बांगलादेश संघात ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. हा सामना २२ नोव्हेंबर पासून कोलकाताच्या ईडन गार्डन्स रंगणार असून खेळाडूंसह चाहत्यामध्ये या सामन्याबाबत उत्सुकता आहे. या सामन्याच्या पहिल्या तीन दिवसांची तिकिटे विकली गेली असल्याचे, बीसीसीआयने नवनियुक्त अध्यक्ष सौरव गांगुलीने सांगितलं आहे. या ऐतिहासिक सामन्याच्या पार्श्वभूमिवर दिवस-रात्र कसोटी आणि पारंपरिक सामन्यातील फरक तसेच नियमावली काय आहे ते वाचा...

पारंपरिक कसोटी सामने हे लाल चेंडूवर खेळले जातात. मात्र, दिवस-रात्र कसोटी सामन्यांमध्ये गुलाबी रंगाचा चेंडू वापरला जातो. हा बदल रात्री फलंदाजांना प्रकाशझोतात चेंडू पटकन दिसावा म्हणून करण्यात आला आहे. आतापर्यंत खेळवण्यात आलेल्या सर्व दिवस-रात्र कसोटी सामन्यासाठी कुकाबुरा या कंपनीचेच गुलाबी चेंडू वापरले गेले आहेत.

इतर प्रथम श्रेणी क्रिकेट प्रमाणेच दिवस-रात्र कसोटीमध्ये ८० षटकानंतर नवा चेंडू घेता येतो. दिवस-रात्र कसोटी सामन्यांमध्येसुध्दा दिवसाला सहा तास आणि ९० षटकांच्या खेळाचे नियोजन असते. पारंपरिक कसोटीत अंधूक प्रकाशामुळे पंच सामना थांबवू शकतात. मात्र दिवस-रात्र कसोटीत सामना प्रकाशामुळे थांबविला जात नाही.

पारंपरिक कसोटीत दोन ब्रेक असतात. पहिला उपहार आणि दुसरा चहापान. असेच दोन ब्रेक दिवस-रात्र कसोटीतही असतात. मात्र, या दोन्ही ब्रेकच्या वेळा मात्र वेगवेगळ्या आहेत.

पारंपरिक कसोटीत पहिला ब्रेक ४० मिनिटाचा असतो. त्याला उपहार असे म्हटले जाते. मात्र, दिवस-रात्र कसोटीत पहिला ब्रेक २० मिनिटाचा असतो. त्याला चहापान असे म्हटले जाते.

पारंपारिक कसोटीत दुसरा ब्रेक हा चहापानाचा असतो. तो २० मिनीटे असतो. मात्र, दिवस-रात्र कसोटीत दुसरा ब्रेक ४० मिनिटाचा असून तो सपर या नावाने दिला जातो. हा ब्रेक जेवण अथवा नाष्ट्यासाठी दिला जातो.

दिवस-रात्र कसोटी सामन्याला सर्वसाधारणपणे दुपारी २:३० वाजता सुरूवात होते. मात्र, कोलकाता येथील दिवस-रात्र कसोटी सामना दुपारी १:३० वाजता सुरूवात होईल.

क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत ११ दिवस-रात्र कसोटी खेळवण्यात आले आहेत. पण भारत आणि बांगलादेशने आतापर्यंत एकही दिवस-रात्र कसोटी सामना खेळलेला नाही.

सुमारे साडेचार वर्षांपूर्वी पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळवण्यात आला होता. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडदरम्यान अॅडलेड मैदानावर हा सामना झाला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ३ गडी राखून विजय मिळवला होता.

हेही वाचा - मराठमोळ्या अजिंक्यला पडतायेत गुलाबी स्वप्न, विराट-शिखरने केलं ट्रोल

हेही वाचा - स्टोक्सच्या 'त्या' पुस्तकावरून आयपीएलच्या दोन संघांमध्ये भांडण!

Intro:Body:

spo

Conclusion:
Last Updated : Nov 19, 2019, 8:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.