ETV Bharat / sports

IND VS SA : कोरोनाच्या धास्तीने भारतीय खेळाडू म्हणतो... 'ही' गोष्ट टाळणार - भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका धर्मशाळा

चेंडूला चमक आणण्यासाठी गोलंदाज आपल्या थुंकीचा वापर करतात. हे आपण अनेकदा पाहिले असेल. पण, यंदा कोरोनाच्या भीतीमुळे भारतीय गोलंदाज ही कृती करणे शक्य तो टाळणार आहेत. अशी माहिती भारतीय संघाचा संघाचा जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.

IND VS SA : Due to Coronavirus scare, Indian bowlers might limit the usage of saliva to shine the ball: Bhuvneshwar Kumar
IND VS SA : कोरोनाच्या धास्तीने भारतीय खेळाडू म्हणतो... 'ही' गोष्ट टाळणार
author img

By

Published : Mar 11, 2020, 5:32 PM IST

धर्मशाळा - भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ३ सामन्याच्या एकदिवसीय मालिकेला उद्या (ता. १२) पासून सुरुवात होत आहे. धर्मशाळा येथे पहिला सामना खेळवला जाणार आहे. पण, जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचे सावट या सामन्यासह संपूर्ण मालिकेवर आहे. या व्हायरसचा धसका भारतीय क्रिकेट संघानेही घेतला असून, गोलंदाजांनी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

चेंडूला चमक आणण्यासाठी गोलंदाज आपल्या थुंकीचा वापर करतात. हे आपण अनेकदा पाहिले असेल. पण, यंदा कोरोनाच्या भीतीमुळे भारतीय गोलंदाज ही कृती करणे शक्यतो टाळणार आहेत. अशी माहिती भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.

  • Due to Coronavirus scare, Indian bowlers might limit usage of saliva for shining ball, says Bhuvneshwar Kumar. #INDvSA #BCCI

    — Press Trust of India (@PTI_News) March 11, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दरम्यान, याआधी दक्षिण आफ्रिका संघाने भारतीय खेळाडूशी हस्तांदोलन टाळणार असल्याचे स्पष्ट केले आहे. धर्मशाळा येथील मैदानावरही कोरोना पासून वाचण्यासाठी काय करावे, यासाठीचे मार्गदर्शन करणारे फलक लावण्यात आले आहेत.

चीनपासून सुरुवात झालेल्या कोरोना व्हायरसचा विळखा दिवसागणिक घट्ट होताना दिसून येत आहे. आजघडीपर्यंत या व्हायरसने जगभरात ४ हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर १०० हून अधिक देशांमध्ये या व्हायरसचा फैलाव झाला आहे. भारतामध्येही ६० हून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे.

हेही वाचा - रणजी अंतिम सामना : सौराष्ट्राचा पहिला डाव आटोपला, आकाशचे चार बळी

हेही वाचा - IPL २०२० स्पर्धा रद्द करा, उच्च न्यायालयात याचिका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.