नवी दिल्ली - भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघावर ५१ धावांनी विजय मिळवत टी-२० मालिकेवर कब्जा केला मंगळवारी झालेल्या चौथ्या सामन्यातही पावसाने हजेरी लावली होती. यामुळे सामना १७-१७ षटकाचा करण्यात आला होता. भारताने हा सामना जिंकत मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.
भारतीय महिला संघ आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघामध्ये ५ सामन्यांची टी-२० मालिका सुरू आहे. मालिकेतील पाहिला सामना भारताने ११ धावांनी जिंकला. त्यानंतर दुसरा आणि तिसरा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. आज मंगळवारी झालेल्या सामन्यातही पावसाने काही वेळ हजेरी लावली. यामुळे षटकांची संख्या कमी करण्यात आली.
हेही वाचा - टीम इंडियाला धक्का, हार्दिक पांड्या 'या'मुळं अनिश्चित कालावधीपर्यंत क्रिकेटपासून लांब राहणार
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आपला दुसरा आंतरराष्ट्रीय सामना खेळत असलेली शफाली वर्मा (४६), जेमिमा रॉड्रिग्ज (३३), दीप्ती शर्मा (२०) आणि कर्णधार हरमनप्रीत कौरच्या १६ धावांच्या जोरावर भारताने १७ षटकात १४० धावा केल्या.
भारताचे १४१ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतलेल्या आफ्रिकेचा संघ १७ षटकात ७ बाद ८९ धावा करु शकला. आफ्रिकेची सुरूवात चांगली झाली होती मात्र, मधल्या फळी कोसळल्याने आफ्रिकेचा ५१ धावांनी पराभव झाला. पूनम पांडे ३, राधा यादव २ आणि दीप्ती शर्माने १ गडी बाद केला. या मालिकेतील सर्व सामने गुजरातच्या लालाभाई कंट्रेक्टर स्टेडियममध्ये खेळवण्यात येत असून मालिकेतील शेवटचा सामना शुक्रवारी होणार आहे.
हेही वाचा - विराट म्हणतो, रोहितने आक्रमक सुरूवात दिली की संपलं...त्यासाठी त्याला पुरेसा वेळ देऊ