विशाखापट्टणम - भारत आणि दक्षिण आफ्रिका संघामध्ये पहिला कसोटी सामना रंगला आहे. प्रथमच कसोटी क्रिकेटमध्ये सलामीला उतरलेल्या रोहित शर्माने या सामन्यात शतकी खेळी केली. पहिल्या डावात रोहित १७६ धावांवर बाद झाला. तत्पूर्वी त्याने, ऑस्ट्रेलियाचे दिग्गज सर डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम मोडीत काढत विश्वविक्रम आपल्या नावे केला.
आफ्रिकेविरुद्ध पहिल्या सामन्यात रोहितने २४४ चेंडूमध्ये १७६ धावांची खणखणीत खेळी केली. या खेळीत त्याने २३ चौकार आणि ६ षटकार लगावले. महत्त्वाचे म्हणजे, रोहितने या धावा ७२.१३ च्या स्ट्राईक रेटने झोडपल्या आणि मायदेशात कसोटीमध्ये १०० च्या सरासरीने धावा करण्याचा मान त्याने पटकावला.
हेही वाचा - IND VS SA : रोहित-मयांकची जोडी जमली रे.., सेहवाग-गंभीरचा १५ वर्षांपूर्वीचा मोडला विक्रम
यापूर्वी, हा विक्रम सर डॉन ब्रॅडमन यांच्या नावे होता. त्यांनी ऑस्ट्रेलियात ५० डावांमध्ये ९८.२२ च्या सरासरीने ४३२२ धावा केल्या होत्या. त्यांच्या सरासरीचा विक्रम रोहितने दहा डावांमध्ये मोडीत काढत यादीत अव्वल स्थान पटकावले. सध्य स्थितीत रोहितची मायदेशातील सरासरी १०० हून अधिक आहे.
सध्य स्थितीत रोहितची मायदेशातील सरासरी १०० हून अधिक आहे. रोहितने भारतामध्ये खेळताना १५ डावांमध्ये ८८४ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने ४ शतके आणि ५ अर्धशतके झळकावली आहेत.
हेही वाचा - भारताची त्रिशतकी सलामी, रोहित पाठोपाठ मयांक अग्रवालचेही शतक!