ETV Bharat / sports

विराट म्हणतो, रोहितने आक्रमक सुरूवात दिली की संपलं...त्यासाठी त्याला पुरेसा वेळ देऊ

दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या पहिल्या कसोटीपूर्वी झालेल्या ३ दिवसीय सराव सामना रोहित शर्मासाठी मोठी संधी मानली जात होती. या सामन्यात रोहित दमदार कामगिरी करेल अशी आपेक्षा व्यक्त करण्यात येत होत्या. मात्र, या सामन्यात रोहित शर्मा शून्य धावावर बाद झाला. यानंतर क्रिकेट विश्वातून रोहितच्या सलामीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. यावर मात्र भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने, रोहितला स्थिरावण्यासाठी पुरेसा वेळ दिला जाईल, असे स्पष्ट केले आहे.

author img

By

Published : Oct 1, 2019, 5:31 PM IST

नवी दिल्ली - दक्षिण आफ्रिकेविरुध्द २ ऑक्टोंबरपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतला विश्रांती देत वृध्दीमान साहाला संधी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे रोहित शर्माला सलामीवीर म्हणून संधी देण्यात आली आहे. दरम्यान, रोहित शर्माला या कसोटीपूर्वी झालेल्या सराव सामन्यात अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्याला या सामन्यात भोपळाही फोडता आला नाही. रोहितच्या या प्रकरणावर भारतीय कर्णधार विराट कोहलीने आपले मत व्यक्त केले आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या पहिल्या कसोटीपूर्वी झालेल्या ३ दिवसीय सराव सामना रोहित शर्मासाठी मोठी संधी मानली जात होती. या सामन्यात रोहित दमदार कामगिरी करेल अशी आपेक्षा व्यक्त करण्यात येत होत्या. मात्र, या सामन्यात रोहित शर्मा शून्य धावावर बाद झाला. यानंतर क्रिकेट विश्वातून रोहितच्या सलामीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. यावर मात्र भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने, रोहितला स्थिरावण्यासाठी पुरेसा वेळ दिला जाईल, असे स्पष्ट केले आहे.

रोहित विषयी बोलताना विराट म्हणाला, 'रोहित शर्मा हा आक्रमक फलंदाज असून तो त्याच्या नेहमीच्या शैलीत संघाला सुरूवात करुन दिली तर संघाची फलंदाजी अधिक मजबूत होईल. सध्य स्थितीत रोहितवर कोणतेही दडपण टाकले जाणार नाही. त्याला कसोटी क्रिकेटमध्ये स्थिरावण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात येईल.'

हेही वाचा - India vs South Africa १st Test : पंतचा पत्ता कट, २२ महिन्यानंतर साहाचे संघात पुनरागमन

कसोटी सामने भारतात आणि परदेशात खेळताना विविध बाबींचा विचार करावा लागतो. तसेच सलामीवीराला पुरेसा वेळ देणे गरजेचे असते, असेही विराट म्हणाला. दरम्यान, रोहित शर्माने गेल्या काही महिन्यांमध्ये कसोटी सामने खेळलेली नाहीत. यामुळे आफ्रिकेविरुध्दच्या कसोटी मालिकेत रोहितवर चांगली कामगिरी करण्याचे दडपण असणार आहे. तसेच तो या मालिकेत सलामीवीरच्या भूमिकेत उतरणार आहे. यामुळे त्यांच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे.

हेही वाचा - आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी चाहत्यांसाठी 'एक' वाईट बातमी

Intro:Body:

Sports

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.