अहमदाबाद - भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना बुधवारपासून अहमदाबादमध्ये खेळला जात आहे. हा सामना दिवस-रात्र सामना असून या सामन्याचा आज गुरुवारी (२५ फेब्रुवारी) दुसरा दिवस आहे. या दिवशी इंग्लंडचा दुसरा डाव ३०.४ षटकांत ८१ धावांवर संपुष्टात आला आहे. तसेच भारताने पहिल्या डावात ३३ धावांची आघाडी घेतल्याने भारतासमोर आता हा सामना जिंकण्यासाठी ४९ धावांचे आव्हान आहे. भारताकडून अक्षर पटेलने सर्वाधिक ५, तर आर अश्विनने ४ विकेट्स घेतल्या. तसेच वॉशिंग्टन सुंदरला १ विकेट मिळाली.
-
3rd Test. 30.4: WICKET! J Anderson (0) is out, c Rishabh Pant b Washington Sundar, 81 all out https://t.co/9HjQB6CoHp #INDvENG @Paytm
— BCCI (@BCCI) February 25, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">3rd Test. 30.4: WICKET! J Anderson (0) is out, c Rishabh Pant b Washington Sundar, 81 all out https://t.co/9HjQB6CoHp #INDvENG @Paytm
— BCCI (@BCCI) February 25, 20213rd Test. 30.4: WICKET! J Anderson (0) is out, c Rishabh Pant b Washington Sundar, 81 all out https://t.co/9HjQB6CoHp #INDvENG @Paytm
— BCCI (@BCCI) February 25, 2021
दुसऱ्या दिवशी भारताला १४५ धावांवर ऑलआऊट केल्यानंतर इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरला. मात्र इंग्लंडच्या डावाची सुरुवात खुपच खराब झाली. पहिल्याच चेंडूवर अक्षर पटेलने इंग्लंडचा सलामीवीर जॅक क्रावलीला शून्यावर क्लिन बोल्ड केले. याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर अक्षरने जॉनी बेअरस्टोला माघारी धाडलं. त्यामुळे इंग्लंडची अवस्था पहिल्या ३ चेंडूतच २ बाद ० धावा अशी झाली होती.
इंग्लंडचा कर्णधार जो रुटने डॉमनिक सिब्लीसह डाव सावरण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अक्षरनेच सिब्लीला (७) बाद करत इंग्लंडला तिसरा धक्का दिला. यानंतर रुटने बेन स्टोक्सला साथीला घेत इंग्लंडच्या डावाला आकार देण्यास सुरुवात केली. या दोघांनी संयमी फलंदाजी करत इंग्लंडची धावसंख्या ५० पर्यंत नेली. मात्र, त्यांची भागीदारी रंगत असतानाच डावाच्या १८ व्या षटकात आर अश्विनने २५ धावांवर खेळणाऱ्या बेन स्टोक्सला पायचीत केले. यानंतर अक्षरने जो रुटला बाद करत भारताच्या मार्गातील मोठा काटा दूर केला. रुट १९ धावांवर यष्टीरक्षक ऋषभ पंतकडे झेल देऊन बाद झाला.
आर अश्विनने ऑली पोप (१२), आणि जोफ्रा आर्चर (०) ला बाद केले. यानंतर बेन फोक्सचा अडथळा अक्षरने दूर केला. जॅक लीच अश्विनचा शिकार ठरला. तर अखेर वॉशिंग्टन सुंदरने जेम्स अँडरसनला बाद करत इंग्लंडचा डाव ८१ धावांवर संपुष्टात आणला.