किंगस्टन : टीम इंडियाने सबीना पार्कवरील दूसऱ्या दिवसाच्या सामन्याच्या दूसऱ्या सत्रात 4 विकेट गमावत 168 धावा केल्या. वेस्ट ईंडीज समोर एकुण 468 धावांचं लक्ष ठेवत डाव घोषीत केला. अजिंक्य रहाणे (64) आणि हनुमा विहारी (53) ने अर्धशतकी खेळी करत 111 धावांची भागीदारी केली आहे.
सलामी फलंदाज मयंक अग्रवाल (4) आणि लोकेश राहुल (6) या डावात चांगली कामगीरी करू शकले नाहीत. चेतेश्वर पुजारानी मात्र 27 धावा करत होल्डरच्या चेंडुवर ब्रूक्सच्या हातात अलगद झेल देत बाद झाला. कर्णधार विराट कोहलीसाठी तीसरा दिवस खराब राहिला. विराटला पहिल्याच चेंडुवर केमार रोचनी बाद केले. जे. हैमिल्टननी विराटचा झेल टिपला.