दुबई - भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धचा तिसरा कसोटी सामना १० गडी राखून जिंकत ४ सामन्यांच्या मालिकेत २-१ ने आघाडी घेतली. तसेच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्याच्या उद्दिष्टाने आणखी एक पाऊल टाकले. दुसरीकडे इंग्लंडचा या पराभवानंतर, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याच्या स्वप्नांना सुरूंग लागला. आता जेतेपदाच्या सामन्यात न्यूझीलंडचा मुकाबला करण्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ शर्यतीत राहिले आहेत.
भारताने अहमदाबाद येथील डे-नाईट कसोटी सामना जिंकून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत ४९० गुणांसह अव्वल स्थानावरील पकड मजबूत केली. या विजयासह भारताच्या विजयाची टक्केवारी ७१% अशी झाली आहे. तर इंग्लंडची टक्केवारी ६४.१ इतकी झाली असून ते चौथ्या क्रमांकावर कायम आहेत.
-
India top the table 👏
— ICC (@ICC) February 25, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
They now need to win or draw the last Test to book a place in the #WTC21 final 👀#INDvENG pic.twitter.com/FQcBTw6dj6
">India top the table 👏
— ICC (@ICC) February 25, 2021
They now need to win or draw the last Test to book a place in the #WTC21 final 👀#INDvENG pic.twitter.com/FQcBTw6dj6India top the table 👏
— ICC (@ICC) February 25, 2021
They now need to win or draw the last Test to book a place in the #WTC21 final 👀#INDvENG pic.twitter.com/FQcBTw6dj6
भारतीय संघ जरी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वलस्थानी असला तरी ते अद्याप अंतिम सामन्यासाठी पात्र ठरलेले नाहीत. त्यांना अजूनही चौथ्या कसोटीच्या निकालावर अवलंबून राहावं लागणार आहे.
भारताला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्यासाठी काय करावं लागेल -
भारताला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे तिकिट मिळवण्यासाठी चौथ्या कसोटीत विजय मिळवावा लागेल किंवा तो सामना अनिर्णीत राखावा लागेल. पण, जर इंग्लंडने हा सामना जिंकला, तर ऑस्ट्रेलियाचे अंतिम सामन्यातील स्थान पक्के होईल. भारताला अंतिम सामना खेळण्यासाठी ३-१, २-१ असा निकाल हवा आहे. तर या मालिकेचा निकाल २-२ असा बरोबरीत लागल्यास ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये प्रवेश करेल.
हेही वाचा - अश्विनने रचला इतिहास, सर्वात जलद ४०० विकेट घेणारा भारतातील पहिला आणि जगातील दुसरा खेळाडू
हेही वाचा - IND VS ENG ३rd Test : भारताचा इंग्लंडवर १० गडी राखून दणदणीत विजय