ETV Bharat / sports

ICC Womens t२० WC : भारत-पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द - आयसीसी महिला टी-२० विश्व करंडक

भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना ब्रिस्बेनच्या अ‌ॅलन बॉर्डर स्टेडियममध्ये होणार होता. पण पावसामुळे नाणेफेकसुद्धा करण्यात आली नाही. पंचांनी मैदानाची स्थिती पाहून सामना रद्द केल्याची घोषणा केली.

icc womens t20 world cup : india women vs pakistan women 5th match warm Match abandoned Due to wet outfield
ICC Womens t२० WC : भारत-पाकिस्तान सामना रद्द
author img

By

Published : Feb 16, 2020, 11:45 AM IST

Updated : Feb 16, 2020, 11:54 AM IST

ब्रिस्बेन - आयसीसी महिला टी-२० विश्व करंडक स्पर्धेला २१ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. याआधी सर्व संघामध्ये सराव सामने खेळवण्यात येत आहे. आज यातील पाचवा सामना भारत-पाकिस्तान यांच्यात खेळवण्यात येणार होता. पण हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे.

ब्रिस्बेनच्या अ‌ॅलन बॉर्डर स्टेडियममध्ये या सामन्याला सकाळी ९ वाजता सुरूवात होणार होती. पण पावसामुळे मैदान ओले झाले होते. यामुळे मैदानावरील पंचांनी तिसऱ्या पंचाशी चर्चा करुन सामना रद्द करण्यात आल्याची घोषणा केली. या सामन्यात नाणेफेकसुद्धा करण्यात आली नाही.

दरम्यान पाकिस्तानविरुद्धचा सामना रद्द झाल्याने चाहते निराश झाले आहेत. कारण भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना नेहमी हायव्होल्टेज ठरतो. भारतीय संघ या सामन्याद्वारे टी-२० विश्व करंडकात विजयी शुभांरभ करण्यास उत्सुक होता.

भारतीय महिला संघ -

  • हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शेफाली वर्मा, जेमिमाह रोड्रिग्स, हरलीन देओल, वेदा कृष्णमूर्ति, तान्या भाटिया, दीप्ति शर्मा, शिखा पांडे, पूजा वस्त्राकर, पूनम यादव, राधा यादव, अरुंधति रेड्डी आणि रेड्डी यादव.

पाकिस्तानचा महिला संघ -

  • बिस्माह मरूफ, जावेरिया खान, सिदरा नवाज़, निदा डार, ऐमेन अनवर, मुनीबा अली, आलिया रियाज, डायना बेग, आयशा नसीम, ​​फातिमा सना, ओमामा सोहेल, सादिया इकबाल, अनम अमीन, इरम जावेद आणि सैयदा शाह.

हेही वाचा -

IPL २०२० : आयपीएलचं बिगुल वाजलं; जाणून घ्या एका क्लिकवर संपूर्ण वेळापत्रक...

हेही वाचा -

IPL २०२० : धोनी इज बॅक, आठ महिन्यांच्या विश्रांतीनंतर खेळणार पहिला सामना

Last Updated : Feb 16, 2020, 11:54 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.