मेलबर्न - ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू शेन वॉटसनने कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती सुधारण्याची आशा व्यक्त केली आहे. वॉटसन म्हणाला, “कोरोना संपल्यानंतर इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) आयोजित केली गेली तर या लीगमध्ये मी चेन्नई सुपर किंग्जकडून आणखी एक वर्ष खेळू शकतो.”
चेन्नईने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये वॉटसन म्हणाला, “मला आशा आहे की येणाऱ्या काळात कोरोना व्हायरसचा परिणाम कमी होईल, यामुळे मी कमीतकमी आणखी एक वर्ष चेन्नईकडून खेळू शकेन.”
“सीएसकेला केवळ चेन्नईमध्ये प्रेम मिळत नाही. आपण जिथे जाऊ तिथे आम्हाला खूप प्रेम मिळते आणि यामुळेच ही गोष्ट मला आवडते. मला आशा आहे की व्हायरस संपुष्टात येईल आणि मला चेन्नईशी पुन्हा संपर्क साधण्याची संधी मिळेल.”
भारतातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवले आहे. त्यामुळे आयपीएल आता अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.